Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / ताईच्या दणक्याने कर्नाटक...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

ताईच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापक नरमले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कर्नाटक एम्टा कामबंद आंदोलनाला आले यश

ताईच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापक नरमले.      आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कर्नाटक एम्टा कामबंद आंदोलनाला आले यश

ताईच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापक नरमले.

 

 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कर्नाटक एम्टा कामबंद आंदोलनाला आले यश

 

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

 

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त, कामगार व ग्रामस्थांच्या विविध समस्यां व मागण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक एम्टा खाणीतील माल वाहतूक बंद करण्यात आली. याची दखल घेत व्यवस्थापकाने महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला. उर्वरीत मागण्या दोन महिन्यात मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला. याप्रसंगी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनील धानोरकर, कंपनी व्यवस्थांक गौरव उपाध्याय, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक राजेश महाजन, युवा नेते राजू डोंगे, प्रवीण बांदुरकर, अजित फाळके, विजय खंगार, मंगेश मंगाम, शशिकला इंगोले, गीता आडे, ललिता आत्राम, सरिता सुर, कविता सुफी, प्रमोद नगोसे, संदीप कुमरे, महेश मोरे, प्रशांत झाडे, लता इंदुरकर,गोरू थैम, तन्वीर शेख, छोटू धकाते, सचिन पचारे, शिवा कोंबे व परिसरातील ग्रामपंचायत मा.सरपंच, उपसरपंच,सदस्य व प्रकल्प बाधित ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी होते.यावेळी कंपनीकडून मिळणारे पुनर्वसन अनुदानात वाढ करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) या दोन्ही बाधीत गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) गावातील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऑप्शन फार्म भरतेवेळी घराच्या मिळणाऱ्या मोबदल्याचे विवरण देण्यात यावे व घराचे दर फलक लावण्यात यावे, गावातील पुनर्वसन होणाऱ्या शेतमजुरांना शेतकऱ्यासारखी ७५० दिवसाची कृषीमजुरी देण्यात यावी, शेतमजुरांना नौकरी किंवा नौकरी ऐवजी एकमुस्त १५ लाख रुपये अनुदान देण्यात यावे, कंपनी मधील कार्यरत कामगारांना HPC वेतन लागू करण्यात यावे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये रोजगार देण्यात यावा, कर्नाटका एम्टा माईन्स ते कोंढा गावालगत असणाऱ्या कोल साईडींगमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे लगतच्या गावांतील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, तसेच कोळशाच्या दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीमुळे लगतच्या शेतातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.ज्याप्रमाणे जिएमआर व वर्धा पॉवर कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतपिकांची कृषी विभागामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जी नुकसान भरपाई झाली ती दिली. त्याच धर्तीवर कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई दयावी व भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्या, या कंपनीने प्रकल्पबाधीत गावांच्या विकासाकरिता आजपावेतो कुठलाही सिएसआर निधी खर्च केला नाही.या सीएसआर निधीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना स्कूल बस देण्यात यावी या मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली.तसेच पीकनुकसान भरपाई, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाने रोडचे मजबुतीकरण, धुळीवर नियंत्रण, ट्रक वाहतूक ओव्हरलोड न करणे व सुरक्षित करणे, परिसरातील ग्रामपंचायतींना सुमारे १ कोटींचा सामाजिक दायित्व निधी देणे, कोंढा कढोली व चोराळा येथील स्मशानभूमी निर्माण करणे, एम्टा मधील कार्यरत कंपन्यांच्या कामगारांची सविस्तर लिस्ट संपूर्ण माहितीसह देणे, त्यात स्थानिकांना देणे, सायडिंग जवळच्या १२ व्यक्तींना सेवेत सामावून घेणे, ९ आश्रित विधवा पत्नी किंवा त्यांच्या वारसांना रोजगार देणे, शेतकऱ्यांसाठी ओव्हर बर्डन चा वापर करून अप्रोच रोड निर्माण करणे, २००५ ते २०१४ पर्यंत प्रलंबित देयकांसाठी भुगतान करणे, तसेच प्रकल्पबाधित गावांचे सरपंचांसोबत मासिक बैठक घेणे त्यात स्वतः गौरव उपाध्याय किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहतील या सर्व बाबी स्वीकृत केल्यावरच आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...