वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
१९ वर्षापासून घुग्घुसमध्ये उपक्रम
चंद्रपूरचे माजी जि.प. अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घुग्घुस येथील गांधी चौक येथे "रक्तदान करूया, प्रेमाचे नाते जोडूया" हे ब्रीद वाक्य घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ठाणेदार आसिफराजा शेख, मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे, नितु चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, विनोद चौधरी, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, प्रेमलाल पारधी, संजय भोंगळे, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्ष किरण बोडे, सुचिता लुटे, वैशाली ढवस उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
देवराव भोंगळे मित्र परिवारातर्फे केक कापून माजी जि. प.अध्यक्ष तथा विधानसभा निवडणुक प्रमुख राजुरा देवराव भोंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सर्व धर्मीय, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, ऑटो संघटना, डग्गा असोसिएशनचे चालक मालक यांनी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
घुग्घुस शहरात सकाळपासून रक्तदान करण्यासाठी युवकांचा रांगा लागल्या होत्या तब्बल १४०९ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महाराष्ट्रात विक्रम केला. त्यामुळे रक्तदात्यांचे शहर म्हणून घुग्घुस शहराची ओळख निर्माण झाली आहे.
सरकारी रक्तपेढी चंद्रपूर व डॉ. हेडगेवार रक्तपेठी नागपूर यांना रक्त संकलन करण्यासाठी बोलाविण्यात आले होते.
देवरावदादा भोंगळे मित्र परिवार घुग्घुसतर्फे मागील १९ वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...