Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / देवराव भोंगळे यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी ३०२६ रक्तदात्यांकडून स्वेच्छा रक्तदान

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी ३०२६ रक्तदात्यांकडून स्वेच्छा रक्तदान

*तुमच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य! - देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन*

 

 

*जिल्हाभर महारक्तदान शिबीरांसह विविध कार्यक्रम संपन्न.*

 

राजुरा, दि. २२ नोव्हेंबर

भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख, माजी जिल्हाध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या ४५ व्या  वाढदिवसानिमित्त काल (दि. २१) जिल्ह्यात विविध ठिकाणी महारक्तदान शिबीरांसह अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये घुग्घुस, राजुरा, बिबी, कोरपना, जिवती, विरूर स्टे., तोहोगांव, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बंगाली कॅम्प चंद्रपूर, इंदिरानगर चंद्रपूर, वरोरा, चंदनखेडा व भद्रावती येथे महारक्तदान शिबीरे संपन्न झाली; तर चंद्रपूर, नकोडा, पालगांव येथेही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

              मागील १९ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून घुग्घुस व राजुरासह अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. यामध्ये एकाच दिवशी ३०२६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून राष्ट्रसेवेत आपले योगदान दिले.

याचसोबत नकोडा येथील चर्च येथे शाळकरी मुलांना साहित्यांचे वाटप, पालगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसुर्य बिरसामुंडा यांच्या पुतळ्यांना अभिवादन, लालपेठ येथील शिवमंदिरात रुद्राभिषेक, चंद्रपूरातील बबूतउल्लाशहा दर्ग्यावर गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप, बाबुपेठ येथे योग मार्गदर्शन शिबीर तर सिद्धेश्वर मंदिरात पुजाअर्चनाही करण्यात आली.

याप्रसंगी आभार मानताना देवराव भोंगळे म्हणाले की,

मागील १९ वर्षांपासून या महारक्तदान शिबीरांचे आयोजन मित्रपरिवाराच्या माध्यमातून होते आणि आबालवृद्धांकडून विक्रमी संख्येने स्वेच्छा रक्तदान केल्या जाते, या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला खरंतर शब्द थिटे पडतात. दरवर्षी रक्तदात्यांच्या आकड्यांत आणि उत्साहात वाढच होत जाते. हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारावणारे आहे. सर्वात कठिण सामाजिक कार्यक्रमांपैकी रक्तदान शिबीराचे आयोजन असते आणि गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आपण ते अविरतपणे करत आहात आणि या प्रेमात तसुभर ही कमतरता जाणवली नाही; त्यामुळे तुमच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य आहे.

पुढे बोलताना, आज सकाळी सात वाजताच मतदानाचे पोलींग बुथ लागावे तसे रक्तदान शिबीरं सुरू झालीत, अनेक ठिकाणी उशीरा सायंकाळपर्यंत रक्तदात्यांची रीघ होती. हे ही निश्चितच नमुद करण्यासारखे आहे. माझ्याप्रती आपला स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो, खरंतर यातूनच मलाही जनसेवेसाठी उर्जा मिळते. असेही ते म्हणाले.

ठिकठिकाणी पार पडलेल्या रक्तदान शिबीरांच्या यशस्वीतेसाठी भाजपचे पदाधिकारी, सर्वपक्षीय मित्रपरिवार आणि सरकारी रक्तपेढी चंद्रपूर, हेडगेवार रक्तपेढी नागपुर, जवाहरलाल नेहरू रक्तपेढी सावंगी मेघे, जिवनज्योती रक्तपेढी नागपुर, शा.वै.महाविद्यालय चंद्रपूर, लाइफलाइन रक्तपेढी आणि अमन रक्तपेढी चंद्रपूर यांनी परीश्रम घेतले.

 

*दादांचा वाढदिवस म्हणजे रक्तपेढ्यांसाठी दिवाळी - डॉ. हनुमान चौधरी*

 

देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील १९ वर्षांपासून रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून हजारो रक्तपिशव्यांचे संकलन होत असून त्यातून शेकडो गोरगरीब गरजूंचे प्राण वाचतात. अनेकांना नवजिवन मिळते. त्यामुळे कित्येकांच्या चेहर्‍यावर आनंद संचारते. जसा दिवाळी सण आपल्या आयुष्यात आनंदाची पर्वणी घेऊन येतो अगदी त्याचप्रमाणे देवरावदादा भोंगळे यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर हा दिवस आमच्या रक्तपेढ्यांसाठी दिवाळी पेक्षा कमी नसते. अशी भावना चंद्रपूर शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे रक्तदान शिबीर संयोजक डॉ. हनुमान चौधरी यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...