वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- येथील बहिरम बाबा देवस्थान जवळ असलेल्या हरिराम गोधरा (एचआरजी) ट्रान्सपोर्ट कंपनीकडून परप्रांतीय ट्रक चालकांचे शोषण केल्या जात आहे.परप्रांतीय ट्रक चालकांना जीआर नियमानुसार २४ ते 27 हजार रुपये महिना पगार देण्यात येईल असे सांगून एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीने घुग्घुस येथे बाहेरील लोकांना कामासाठी बोलाविले परंतु त्यांना इथे आल्यावर २२ हजार रुपये महिना देण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून परप्रांतीय ट्रक चालक एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करीत आहे.
त्यांना कंपनीच्या कॅम्प मध्ये राहावे लागते कॅम्प मध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण तसेच दूषित पाणी देण्यात येते.कॅम्प मध्ये बाहेरील लोकांना शिवीगाड तसेच शोषण करण्यात येत आहे मुंगोली ते घुग्घुस असे ४५ किमी अंतर गाठून फेरा मारावे लागते.रस्ता खराब असल्याने ट्रकचे पट्टे तुटले जाते याचे ५ हजार रुपये ट्रक चालकाचे पगारातुन कपात केली जाते.रात्री जास्त धडपड असल्यामुळे ट्रक चालकांची झोप होत नाही परंतु कंपनीचे मालक व सुपरवायजर दबाव टाकून तीन फेरा मारा असे सांगते त्यामुळे ट्रक चालकांना १२ ते १४ तास काम करावे लगत आहे असा आरोप एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कामगारांनी केला आहे.
त्यामुळे सोमवारी २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हरिराम गोधरा (एचआरजी) ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक चालक शिरपुर पुरड येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
ट्रक क्रमांक आरजे २३ टीआर ४४०९ चा चालक हरिसिंग यादव (२२) रा. ध्वरीसागर, युपी हा मुंगोली कोळसा खाणीतून ४ वाजता ट्रकमध्ये कोळसा भरून निघाला व घुग्घुसच्या ओल्ड रेल्वे सायडींगवर कोळसा खाली करून परत जात असतांना वणी तालुक्यातील पुरड गावाजवळच चालकाने समोर जाणाऱ्या ट्रकला मागून जबर धडक दिली त्यामुळे ट्रकचे समोरचे कॅबीन चेंदामेंदा झाल्याने ट्रक चालकाचा कॅबीन मध्ये दबून मृत्यू झाला. ट्रक चालकांनी ट्रॅकच्या कॅबीनला गॅस कटरने कापून,जॅक लावुन व इतर सामग्रीने चालकाचा मृतदेह बाहेर काढला.
त्यामुळे संतप्त झालेल्या ट्रक चालकांनी घुग्घुस येथील एचआरजी कंपनीच्या कॅम्प जवळच आपल्या शेकडो ट्रका उभ्या ठेवून कामबंद ठेवले तसेच २० लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती मृतक चालक याची झोप न झाल्याने अपघात झाला असा आरोप ट्रक चालकांनी केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...