Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावती कृषि उत्पन्न...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टाकळी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ* *पहिल्याच दिवशी 7325 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी* *भद्रावती बाजार समिती पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव कार्य करीत राहतील : रविंद्र शिंदे*

*भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टाकळी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ*    *पहिल्याच दिवशी 7325 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी*    *भद्रावती बाजार समिती पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव कार्य करीत राहतील : रविंद्र शिंदे*

*भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टाकळी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ*

 

*पहिल्याच दिवशी 7325 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी*

 

भद्रावती बाजार समिती पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव कार्य करीत राहतील : रविंद्र शिंदे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भदावती:-स्थानिक भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार नंदोरी अंतर्गत मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज टाकळी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ दि. 21/11/2023 रोज मंगळवारला करण्यात आला. पहिल्याच दिवशी 51 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कापूस खरेदी प्रसंगी आयोजित कार्यक्रमास अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तसेच उद्घाटक भद्रावती बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे उपस्थित होते.भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीव्दारे पहिल्याच दिवशी रुपये 7325 प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करण्यात आले. कापूस विक्रीसाठी आलेले शेतकरी स्वप्निल ईखारे, कोंढा, शुभम कार्लेकर, कोंढा, मोहम्मद खलील यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन भद्रावती यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भद्रावती कृषी बाजार समितीचे संचालक गजानन उताणे, मनोहर आगलावे, कान्होबा तिखट, परमेश्वर ताजणे, शामदेव कापटे, प्रविण बांदुरकर, भद्रावती कृ.उ.बा. समिती सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज प्रा. लि. चे अविश बाहे, सुभाष बाहे, दिपक गौरकार, किशोर वालदे, प्रशांत कारेकार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनासाठी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी प्रविण राहुलगडे, विलास पालकर, अरूण पाठक, मुकेश वांढरे, रमेश सकिनवार यांचे सहकार्य लाभले.  या कार्यक्रम प्रसंगी भद्रावती बाजार समिती पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव कार्य करीत राहतील असे रविंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी आपला शेतमाल मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज टाकळी येथे विक्रीस आणावा, असे संयुक्त आवाहन भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे, उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे), सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...