Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रीय महामार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रीय महामार्ग काम जोरात गौण खनिज निधिला चुना ?* *महसुल व खनिकर्म विभागाची कृपादुष्टीचा प्रकार*

*राष्ट्रीय महामार्ग काम जोरात गौण खनिज निधिला चुना ?*  *महसुल व खनिकर्म विभागाची कृपादुष्टीचा प्रकार*

*राष्ट्रीय महामार्ग काम जोरात गौण खनिज निधिला चुना ?*

*महसुल व खनिकर्म विभागाची कृपादुष्टीचा प्रकार*

   

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

  कोरपना:-महाराष्ट्र शासन निर्णय दि २९ नोव्हबर २०१७ च्या आधारावर राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ बि प्राधिकरणाच्या मागणी नुसार  जि आर आय एल कंपनीला जिल्हाधिकारी यानी प्रथम २४ मार्च २०२३ ला धामनगाव आसन वडगाव वनसडी देवघाट शेरज हेटी नाला चनई हातलोणी व नारंडा तलावातील ३लाख १इजार दोनशे अडुसष्ट परिणाम ब्रास उत्खननाची परवानगी १ते २२ अटी च्या अधिन दिली या सर्व अटी केराच्या टोपलीत टाकीत रात्र दिवस २४ तास जोरदार उत्खनन करूण ४ पट रेती दगड मुरुम वापरल्या जात आहे मंजुरी आदेशानुसार पहिला अट सिमांकन करण्याची आहे मात्र स्थळ व मौक्यावर कोनताही अधिकारी हाजर राहून सिमांकन केलेले नाही टेबलवर पंचनामे बोगस व चुकीचे तयार केले उत्खनन मंजूर मर्यादा तसेच  चतुरसिमा नमूद केले नाही मोघम पंचनामे करूण शासनाची दिशाभुल केली आहे व जल संधारण अधिकारी यांच्या उपयोगिता प्रमाण पत्र संशयास्पद व दिशा भुल करणारे आहे शासन निर्णय नुसार राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळ व संबधित यंत्रणा याच्या समन्वयातून प्रकल्प स्थळ जवळ उत्खनन करावे व स्थानिक ग्राम पंचायतीना सहकार्य व परवानगी द्यावी असे नमूद असताना आदिवासी भागातील पेसा क्षेत्रात ग्रामसभेला डावलुन व कंत्राटदार सर्व परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे सांगत परिसरातील सर्व नाले नियमबाह्य पाषणात उघडे होत पर्यंत उत्खनन झाल्यानं अनेक गावात पाणी टंचाई ची झळा पोहचणार आहे पायाभुत सुविधेच्या नावावर सर्व नाले रेती दगड साफ करण्याची जणू मोहीम या भागात सुरु आहे धुनकी हेटी येथे तलाव नसताना गायरान जमीनीवर सर्वउच्चन्यायलयाचे निर्देश शासनाला असताना तिथे कंत्राटदार कंपनीला उत्खनाची परवानगी मिळाली कशी  उत्खनन वाहतुक नियमाचे पालन होत नाही वाहतुक पास ठिकाण दिनांक वेळ या बाबत पासेस दिल्या जात नाही उत्खनन झालेल्या जागेचे मोजमाप मोजणी झालीच नाही मंजुरी खोली पेक्षा सर्रास अधिक उत्खनन केल्या जात आहे याबाबत महसुल अधिकारी खनिकर्म विभागाला संपूर्ण २४ तास सुर्यादय ते अस्त व रात्रौ भर सुर असलेल्या उत्खनाची माहीती असताना कार्यवाही व चौकशी कडे दुर्लक्ष करून स्वताच दिलेल्या आदेशातली अट क्र ७ चे उल्लंघन करूण शासनाच्या स्वामित्वधनाच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोन?  महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (७) नुसार कार्यवाही कडे तक्रार असताना यत्रंणा गप्प कशी असा सवाल नागरीक उपस्थीत करीत असताना रेती बाबत शासनाचे धोरण ठरले मात्र पांढरपौणी शिवार संपूर्ण रस्ते कामावर वापर झाला कसा पकडीगडम कालवा व विसर्ग नाला संपूर्ण खोदकाम करूण पाटबंधारे विभागाची १ ते दिड कोटी ची हानी झाली ६ महीने लोटून सुद्धा कामाची सुरुवात संबधित कंत्राटदारानी सुरु केली नाही कार्यकारी अभियंता यांनी २५ / १० / 2023 ला अधीक्षक अभियंता यांना मार्च २०२३ मध्ये जि आर इन्फ्रा यांनी सांडव्यातिल स्पील चॅनल नुकसानी चा अहवाल दिला व कंपनीने उपरोक्त बांधकाम करूण देण्याची हमी दिली होती मात्र अजून कामाला तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही मात्र त्या कालव्यातील लाखो ब्रास मुरूम रेती कशी भरणार पाटबंधारे विभागाने मोजमाप नुसार प्रत्यक्ष उत्खनन किती झाले हे नमूद नाही मात्र स्पील चॅनल बाधून पाण्याचा वेग थांबविण्यात मदत होऊल मात्र पाषाण उघडे पडल्याने पाण्याचा निचरा होणार नाही हे मात्र खरे रूपापेठ नाल्यावरूण मोठ्या प्रमाणात मान्येते पेक्षा अधिक उत्खनन जोरात सुरु आहे कत्रांट दाराच्या प्रत्यक्ष कामावर वापर झालेल्या मुरूम रेती दगड माोजमाप पुस्तीका नुसार गौण खनिज स्वामीत्वधन आकारण्यात यावा व विषेश  पथकद्वारे उत्खनन तपासणी चौकशी व मोजमाप घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांनी महसुल व खनिकर्म मंत्री जिल्हाधिकारी याचे कडे निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...