Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आधुनिक भारताच्या नवनिर्माणात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आधुनिक भारताच्या नवनिर्माणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे* *माजी पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात* *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार*

*आधुनिक भारताच्या नवनिर्माणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे*    *माजी पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात*    *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार*

*आधुनिक भारताच्या नवनिर्माणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे*

 

*माजी पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात*

 

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यातील आर्वीचे सरपंच सुरज माथनकर, चार्लीचे सरपंच विजय निवलकर, उपसरपंच सचिन धांडे, ग्रामपंचायत सदस्य आर्वीचे अंकुश मस्की, दिलीप डाखरे, प्रफुल उपरे, मारोती आसमपल्लीवार, गीरजाबाई शिवनकर, शालू येल्लुरे, प्रियंका थेरे, विद्या माथनकर, रामपूरचे शरद शेंडे, मायाताई करलुके, सास्ती चे मधुकर झाडे या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, आधुनिक भारताच्या नवनिर्माणात स्व. पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशासमोर अनेक आव्हाने उभी होती त्यावर मात करून मोठ्या हिमतीने आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी हा देश मजबूत केला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे आणि काँग्रेसचे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्याच क्रांतीकारी इतिहासाला स्मरून गावागावात आणि शहराशहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून जनसेवेला वाहून घ्यावे, केंद्र आणि राज्यातील हुकुमशाही सरकारचा खोटारडेपणा उघड करावा, काँग्रेसची विकासकामे जनतेच्या लक्षात आनुन द्यावीत असे आवाहन केले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, अॅड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निर्मला कुळमेथे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, उमाकांत धांडे, नंदकिशोर वाढई, माजी सभापती कुंदा जेणेकर, अभिजीत धोटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने यासह राजुरा तालुक्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, कृ. उ. बा. स. संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, वि. यु. काँ. चे अध्यक्ष उमेश गोनेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रा. वि. काँ. चे प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...