Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अल्ट्राटेक सिमेंटच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनास अ. भा. सरपंच परिषदेचा पाठिंबा*

*अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनास अ. भा. सरपंच परिषदेचा पाठिंबा*

*अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनास अ. भा. सरपंच परिषदेचा पाठिंबा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या विरोधात दत्तक ग्रामपंचायत चे धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिला आहे.या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सरपंचांना आणि ग्रामस्थांना जर अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी अन्यायाची वागणूक देत असेल तर अखिल भारतीय सरपंच परिषद हे खपवून घेणार नाही. कंपनी ने लाईमसटोन ची जड वाहतूक करायची, दत्तक ग्राम पंचायत मध्ये प्रदुषण करायचं, कुठेही पर्यावरण मुक्त गाव ठेवण्यासाठी काम करायचं नाही, स्थानिक ग्राम पंचायत मधील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दयायचं नाही, कंपनी च्या उत्पन्नाच्या आधारित सि एस आर फंड दत्तक ग्राम पंचायत सरपंचांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे ते पण कंपनी करत नाही, ज्या दत्तक गावांच्या भरवसावर ही कंपनी आवाळपुर येथे उभी राहिली आहे त्या अन्नदाता शेतकर्यांसाठी त्यांच्या पांदन रस्तासाठी ही कंपनी काहीच करत नाही. या कंपनी चे प्रदुषण, धुळ, दुषित पाणी, हवा, ध्वनी प्रदुषण, जळवाहतूक यामुळे अपघात, दमा, कॅन्सर, श्वसनाचे आजार अशा एक नाही अनेक समस्यांना स्थानिक ग्राम पंचायतींना आणि ग्रामस्थांना जावे लागते. कंत्राटी कामगार व पर्मनंट कामगार यामध्ये दुजाभाव केला जातो, हा दुजाभाव अखिल भारतीय सरपंच परिषद खपवून घेणार नाही असे सांगितले. जर आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास फक्त चंद्रपूर जिल्ह्य़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.या प्रसंगी प्रा. आशिष देरकर, रत्नाकर चटप, मेघा पेंदोर, प्रियंका दिवे, सुनीता तुमराम, संजना बोंडे, पुरुषोत्तम आस्वले, शालिनी बोंडे, ज्योती जेनेकर, अरुण रागीट, संगीता मडावी, ज्योती धोटे, बाळकृष्ण काकडे, अरुण काळे, आशाताई खासरे, मंगला गायकवाड, सुजाता चौधरी, सुनिता आत्राम, जयश्री ताकसांडे, सुषमा गेडाम, माया मडावी, संतोषी माहुलीकर, निर्मला मरसकोल्हे, ताईबाई लेडांगे, कुसुम संकुलवार, सविता घटे, अर्चना बोढे, तृप्ती गोहने, संतोष पोटे यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...