Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *गडचांदूर शहराची 'उडता...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*गडचांदूर शहराची 'उडता पंजाब' होण्याच्या दिशेने वाटचाल.!* *तरुणाई नशेच्या विळख्यात,ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह.?*

*गडचांदूर शहराची 'उडता पंजाब' होण्याच्या दिशेने वाटचाल.!*    *तरुणाई नशेच्या विळख्यात,ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह.?*

*गडचांदूर शहराची 'उडता पंजाब' होण्याच्या दिशेने वाटचाल.!*

 

*तरुणाई नशेच्या विळख्यात,ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह.?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदुर:-कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात सध्या गांजा विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजरोसपणे विक्री होत असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे.याठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सुद्धा होत असल्याची माहिती असून इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजा सहज उपलब्ध होत असल्याने तरूणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे.शहरात गांजा विक्रेते कोण ? याची माहिती पोलिसांना नसावी,हे पचणी पडत नाही.गांजा विकणारे यांना सापडत नाही की, पकडायचेच नाही,हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.  गडचांदूर शहरातील शिवाजी चौक,संविधान चौक आणि काही आलीशान पान शॉपीवर रात्री उशिरापर्यंत काही तरूण एका कोपऱ्यात बसून गांजा ओळत असल्याचे बोलले जात आहे.पहिले सिगारेट घेऊन त्यातील तंबाखू काढले जाते,नंतर त्या रिकाम्या रिगारेटच्या पुंगळीत सोबत आणलेला गांजा भरून त्याच पान शॉपी मधून 'गोगो पाईप' घेऊन बिनधास्त सिगारेट ओढतात,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.त्याबरोबर रेल्वे स्टेशन व इतर निर्जीव ठिकाणी दिवसा व रात्रीच्या सुमारास काही तरूण गांजा भरलेली सिगारेट ओढत असल्याची सुद्धा माहिती आहे.गांजाची नशा करणाऱ्या तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही.गांजा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता असेल तर,पोलिसांसाठी हे केवळ 4 दिवसांचे काम आहे.मात्र असे होताना दिसत नाही.? थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन यांना गांजा पुरवणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचता येते. तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजा विक्री रोखणे शक्य होणार आहे.मात्र विक्रेत्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी सुरू असून यामुळे ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.गांजा विक्रेत्यांना अभय देण्यापेक्षा त्यांच्यावर कायद्याची दहशत निर्माण करून पोलिसांनी तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे,अन्यथा भविष्यात गडचांदूरचा 'उडता पंजाब' होण्यास वेळ लागणार नाही,हे मात्र नक्की.तरुणाईला या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी थेट गांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेची असताना ठाणेदार आता यासंदर्भातील कारवाईला केव्हा सुरुवात करणार,हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...