Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंच्या फोनची...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंच्या फोनची तात्काळ दखल.* *जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जमा : अंधारमय दिवाळी होणार उजेडाची* *जनसंपर्क कार्यालयातून जन समस्यांचे निराकरण व्हावे : आमदार सुभाष धोटे.*

*आ. सुभाष धोटेंच्या फोनची तात्काळ दखल.* *जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जमा : अंधारमय दिवाळी होणार उजेडाची*      *जनसंपर्क कार्यालयातून जन समस्यांचे निराकरण व्हावे : आमदार सुभाष धोटे.*

*आ. सुभाष धोटेंच्या फोनची तात्काळ दखल.* *जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जमा : अंधारमय दिवाळी होणार उजेडाची*  

 

*जनसंपर्क कार्यालयातून जन समस्यांचे निराकरण व्हावे : आमदार सुभाष धोटे.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-- गोंडपीपरी येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले. उद्घाटन सोहळ्या दरम्यान गोंडपिपरी येथील आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांना निवेदन देऊन  समस्या मांडली. संघटनेचे निवेदन प्राप्त होताच आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन केला, व ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन का दिले गेले नाही ?, आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, वेतन तात्काळ जमा करा असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याची संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सर्व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन लगेच जमा केले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनात अभावी  अंधकारमय झालेली दिवाळी आता प्रकाशमय झाली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी संघटनेने आ. धोटे यांचे आभार मानले आहेत.यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे हे जनसंपर्क कार्यालय गोंडपीपरी तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल. काँग्रेस कार्यकर्ते या कार्यालयातून जनसेवेचे कार्य उत्तमपणे पार पाडतील याचा पुर्ण विश्वास आहे. आपण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून क्षेत्रातील चारही तालुक्यातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून विविध विकासकामे पूर्ण केलेली आहेत. येणाऱ्या काळात अनेक आवश्यक विकासकामांसाठी आपला आग्रह असेल.  या प्रसंगी गोंडपीपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, पोंभूर्णा कृ. उ. बा. स. सभापती रविभाऊ मटपल्लीवार, माजी सभापती सुरेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजुभाऊ चंदेल, माजी सरपंच दीपक फलके, कृ. उ. बा. स. माजी संचालक शंभू येलेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, गोंडपीपरी चे नगराध्यक्ष सविता कुळमेथ, उपनगराध्यक्ष सारिका मडावी, काँग्रेस कमिटीचे उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र बट्टे, कृ.उ. बा. स. संचालक अशोक रेचनकर, संतोष बंडावार, काँग्रेस कार्यकर्ते अजय माडूरवार, यु. काँ. चे तालुकाध्यक्ष विपिन पेदुलवार, शहराध्यक्ष राजू झाडे, महिला काँ. तालुकाध्यक्षा सोनिताई दिवसे, साई कोडापे ,संजय झाडे, शिणू यासह गोंडपीपरी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...