Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *घ्या..भाजपा जिल्हाध्यक्षांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*घ्या..भाजपा जिल्हाध्यक्षांनी सुद्धा केली 'प्रतीक'ची पक्षातून हकालपट्टी* *मी अजूनही पक्षातच,अशी अफवा पसरवून दिशाभूल.?*

*घ्या..भाजपा जिल्हाध्यक्षांनी सुद्धा केली 'प्रतीक'ची पक्षातून हकालपट्टी*      *मी अजूनही पक्षातच,अशी अफवा पसरवून दिशाभूल.?*

*घ्या..भाजपा जिल्हाध्यक्षांनी सुद्धा केली 'प्रतीक'ची पक्षातून हकालपट्टी*

 

 

*मी अजूनही पक्षातच,अशी अफवा पसरवून दिशाभूल.?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस तथा गडचांदूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा,नगरसेवक अरविंद डोहे यांच्या पत्नी सौ.विजयालक्ष्मी अरविंद डोहे,यांना दारूचे सेवन करून अश्लील शिवीगाळ करत अपमानित केल्या प्रकरणी कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष 'नारायण हिवरकर' यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत 21 आक्टोबर रोजी गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्ता 'प्रतिक सदनपवार' याची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली.याच पार्श्वभूमीवर एका महिलेच्या सन्मानार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा यांनी सुद्धा एका पत्राद्वारे 'प्रतीक सदनपवार'ला पक्षातून निलंबित केले आहे.

*भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचे पत्र.*

प्रति.

श्री.प्रतिक सदनवार.

महोदय,

5/10/2023 रोजी रात्री उशिरा भाजप नगरसेवक श्री.अरविंद डोहे यांच्या घरी जावून शिवीगाळ करून त्यांच्या परिवारातील सदस्यांना मानसिक त्रास दिला.त्यामुळे श्री.डोहे यांची पत्नी भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ.विजयालक्ष्मी अरविंद डोहे यांची प्रकृती हालावली त्यांना उपचारास्तव चंद्रपूर येथे दवाखान्यात भरती करावे लागले.ही,बाब अत्यंत निंदनीय आहे.आपसी कलहात आपण पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत योग्य शिष्टाचाराने न वागणे ही विचारसरणी पक्ष संघटने करीता पातक असल्याने आपणास पक्षातून निलंबित करण्यात येत आहे.'असे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष 'हरीश शर्मा' यांनी गेल्या 29 आक्टोबर 2023 रोजी काढले आहे.'प्रतिक सदनपवार' यांनाही पत्र पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

असे असताना 'मी पक्षातच आहे,तालुकाध्यक्षांना काही समजत नाही' जिल्हाध्यक्षांनी थोडी मला काढले' असे ठिकठिकाणी सांगत असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती.मात्र आता खुद्द जिल्हाध्यक्षांनीच याला निलंबित केल्यामुळे खरं काय आणि खोटं काय,समोर आले आहे.भाजपा पक्ष हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष असून असे कार्यकर्ते पक्षाच्या सांस्कृती विरूद्ध वागत असल्याने पक्षातील महिलांचा अपमान होतेय.याचबरोबर पक्षाची प्रतिमा सुद्धा मलीन होते.या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करून पक्षश्रेष्ठींनी एका अर्थाने महिलांना सन्मान व न्यायच दिला आणि नवीन उर्जा,उत्साव निर्माण केला आहे.यापुढे जर हा व्यक्ती पक्ष कार्यात ढवळाढवळ करताना आढळल्यास आम्ही पक्षात राहायचं की नाही ? याचा विचार करावा लागेल.अशी, प्रतिक्रिया पक्षातील काही महिलांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...