आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय बौध्द महासभा नगर शाखा घुग्घुस पंचशील बौध्द विहार येथे यशोधरा महिला मंडळ तर्फे वर्षावास धम्म प्रवचन मालिका समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव भारतीय बौध्द महासभा नगर शाखा घुग्घुस व प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते.
या काळात उपोसथ विधी ‘अशुद्ध मनाची शुद्धता’ करण्याचा हा काळ आहे. बौद्ध धम्मामध्ये गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी तथागतांच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे. त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली.
दुसरी घटना म्हणजे भगवंतांनी सारनाथ या ठिकाणी पहिले धम्मचक्र प्रवर्तन करून आपल्या पाच शिष्यांना प्रथम धम्मोपदेश दिला. त्यामुळे या शिष्यानी भगवंताला आपले गुरू मानले. म्हणून ही आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तिसरी घटना म्हणजेच याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली. गुरुपौर्णिमेपासून तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते.
वर्षावास म्हणजे काय?वर्षावास ही बुद्धकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजेच पावसाळ्याच्या तीन महिने भिक्खूंना पावसापासून त्रास होऊ नये, त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा, अशी परंपरा आहे.
बुद्धविहारात धम्मग्रंथाचे वाचनपौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात प्रत्येक बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन करण्यात येते. त्याचप्रमाणे विपश्यना (ध्यानसाधना), त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना, उपोसथ विधी आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात. वर्षावासाच्या दरम्यान पूजनीय भिक्खू संघाला घरोघरी भोजनदानासाठी आमंत्रित केले जाते. त्यानंतर त्यादिवशी घरी सामुदायिक ध्यानसाधना, परित्राणपाठ व धम्मदेसना आयोजित करून आपल्या नातेवाइकांना व मित्र परिवार व शेजारी सर्वांना धम्म श्रवण करण्यासाठी निमंत्रित केले जाते.बुद्ध आणि त्यांचा धर्म ग्रंथाचे वाचन विहारांमध्ये तीन महिने भिक्खूंचे अधिष्ठानमनाच्या शुद्धतेसह मैत्रिधर्म निभावण्याचा काळ.
बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे आहे. विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही तसेच बुद्धाचा धम्म आहे. त्रिसरण, पंचशील पाळणे म्हणजेच बुद्धाचा धम्म आचरणात आणणे होय. वर्षावासदरम्यान विविध बुद्धविहारांमध्ये तीन महिने उपासक-उपासिका उपोसथ शील, अष्टशील ग्रहण करतात.
असे वर्षावासाची माहिती उपासक व उपासिकाणा देण्यात आले
आणि यशोधरा महिला मंडळ तर्फे भोजनाचा कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाचे संचालन आयुनी रिताताई देशकर तर आभार प्रदर्शन शरद पाईकराव यांनी केले
प्रमुख मार्गदर्शक पुज्यनीय धम्म प्रकाश संभोधी भन्ती पुज्यनीय श्रमण अमनतंन बोधी
कार्यक्रमाचे अध्यक्ष - सुरेश मल्हारी पाईकराव
प्रमुख मार्गदर्शक
आयुनी सुजाताताई लाटकर मॅडम महिला उपाध्यक्षा भा. बौ. महा. चंद्रपूर
आयु किशोर तेलतुंबळे सर सरचिटणीस भाग. सौ. महा. चंद्रपूर आयुनी कविताताई चांदेकर मॅडम केंद्रीय शिक्षिका भद्रावती चंद्रपूर. आयुनी. मायाताई सांड्रावार केंद्रीय शिक्षिका घुग्घुस चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव बौद्धचार्य कृष्णाक पेरकावार सर वेलेकर सर गजभिये सर खोब्रागडे सर आयुनी पंचशीलाताई भरणे भा. बौ. महा. कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे चंद्रपूर रमाबाई सातारडे महासचिव भा. बौ. महा. सल्लागार संभाजी पाटील घुग्घुस यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर उपाध्यक्षा प्रतिभाताई कांबळे सचिव स्मिताताई कांबळे सुरेखाताई फुलकर महासचिव सुषमाताई धोटे सल्लागार भाग्यश्रीताई भगत सल्लागार पंचफुलाताई पाटील प्रतीभा सोंडुले व समस उपासिका उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...