Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *२१२३ रुग्णांनी घेतला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*२१२३ रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबीराचा लाभ : अनेक दुर्धर आजारांवर होणार उपचार* *आ. सुभाष धोटे मित्रपरिवार तर्फे भव्य आयोजन*

*२१२३ रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबीराचा लाभ : अनेक दुर्धर आजारांवर होणार उपचार*    *आ. सुभाष धोटे मित्रपरिवार तर्फे भव्य आयोजन*

*२१२३ रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबीराचा लाभ : अनेक दुर्धर आजारांवर होणार उपचार*

 

*आ. सुभाष धोटे मित्रपरिवार तर्फे भव्य आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :- कोरपणा तालुका एक दुर्गम, आदिवासी बहुल आणि ग्रामीण तालुका असून या परिसरात अनेक दुर्धर आजाराने नागरिक त्रस्त आहेत मात्र महागडे उपचार परवडत नाहीत. आरोग्याच्या विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचत असूनही अनेक नागरिक दुर्धर आजाराच्या उपचारापासुन वंचित असतात ही बाब ओळखून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे मित्रपरिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यामानाने वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) चे प्रत्येक विषयाचे तज्ञ डॉक्टर व टिम ने आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज व्यवस्थेसह नागरिकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या महाआरोग्य शिबीरात २१२३ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी दंत आजार, मुखाचे आजार, स्तनांचे कर्करोग व इतर आजार, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, अस्थिरोग, श्वसन रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, काचबिंदू आजार, कान, नाक, घसा, डोळ्यांचे आजार, पोटाचे विकार, शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल आदींचे स्पेशलिस्ट डॉक्टर आणि तपासणी करणारे सुसज्ज वाहन, मॅमोग्राफी मशीन, तसेच विविध आजाराचे निदान करणारे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होते. विविध आजारांची तपासणी करून रूग्णाना सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून कोरपणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, श्रीधरराव गोडे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे,  स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संध्याताई पझ्झई, डॉ. प्रसाद देशमुख, डॉ. अभिषेक जोशी, एन. पी. शिंगणे, डॉ. देशमुख, डॉ. संदीप बांबोडे, प. स. चे माजी सभापती श्याम रणदिवे, कृ. उ. बा. समितीचे सभापती अशोक बावणे, भाऊराव कारेकर, अभिजित धोटे, यु. काँ. चे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सुरेश मालेकर, संभा कोवे, सीताराम कोडापे, कोरपना च्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे, उपाध्यक्ष इस्माईल शेख, नगरसेवक नितीन बावणे, सचिन भोयर, राजबाबु गलगट, भाऊराव चव्हाण, स्वप्नील टेंभे, गणेश गोडे, मनोहर चन्ने, राहुल मालेकर, संकेत जोगी, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, रोशन मरापे, प्रेम बोढे यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...