Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

 

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश

 

घुग्घुस येथील अमराई वार्डातील  भूस्खलनबाधित १६० कुटुंबियांना हक्काची घरे मिळणार आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश आले आहे. पट्टे मिळवून देण्यासाठी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी अथक पाठपुरावा केला होता.

 

महसूल व वन विभागाने आपत्तीप्रणव गावाचे पुनर्वसन अंतर्गत अमराई वार्ड घुग्घुस येथील भूस्खलनामुळे बाधित १६० कुटुंबियांच्या पुनर्वसनाकरीता मौजा घुग्घुस येथील शासकीय जमीन स. नं. २९/१ आराजी ५९.४७ हे. आर. जागेपैकी २.४० हे. आर. (६ एकर) जागा उपलब्ध करून देणेबाबत शासनाने दिनांक ०१.११.२०२३ रोजी  निर्णय घेतला आहे.

 

भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. घुग्घुस येथील अमराई वार्डात झालेल्या भूस्खलनात घरे गमावलेल्या बाधित १६० कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याबाबतची आढावा बैठक विधानभवनात महसूलमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्त उपस्थित होते. या बैठकीत भूस्खलनग्रस्तांना तत्काळ भूखंड देण्यासाठी कारवाही करावी अशा सूचना तीनही मंत्रीमहोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यापूर्वी भूस्खलनग्रस्तांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची तत्काळ मदत भाजपातर्फे करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला होता. मा. ना. सुधीरभाऊ  मुनगंटीवार यांच्या माध्यमातून धान्यकिट व जीवनावश्यक विविध साहित्याची किट १६० भूस्खलनग्रस्त कुटुंबीयांना वाटप करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे वेकोलितर्फे १६० कुटुंबीयांना प्रत्येकी ६ महिन्याचे घरभाडे दोनदा भूस्खलनग्रस्तांना देण्यात आले होते.  माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हे भूस्खलनग्रस्त कुटुबियांच्या पाठीशी ठामपणे उभे होते.

 

पट्टे मंजूर झाल्याबद्दल भूस्खलनग्रस्तांतर्फे लाडू वाटप करून आनंदोउत्सव साजरा करण्यात आला. सर्व भूस्खलनग्रस्तांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे बबलू सातपुते, शाम आगदारी व मोठया संख्येत भूस्खलनग्रस्त उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...