Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *Rccpl कंपनी विरूद्ध,नेमीचंद...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*Rccpl कंपनी विरूद्ध,नेमीचंद काटकरचे१८ दिवसाचे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण* *अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कडून व प्रशासन आश्वासनानंतर समाप्ती*

*Rccpl कंपनी विरूद्ध,नेमीचंद काटकरचे१८ दिवसाचे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण*  *अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कडून व प्रशासन आश्वासनानंतर समाप्ती*

*Rccpl कंपनी विरूद्ध,नेमीचंद काटकरचे१८ दिवसाचे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण*

*अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कडून व प्रशासन आश्वासनानंतर समाप्ती*

 

*विभागीय आयुक्त नागपूर येथे, ओबीसी आयोग सुनावणी मध्ये लिज क्षेत्रातील संपूर्ण७५६ हेक्टर  जमिनीचे एकमुस्त भूसंपादन व इतर १२मागणीचे  निर्णय पुर्ण होईपर्यंत*

 

*परसोडा चुनखडी लिज क्षेत्रातील Rccpl कंपनीचे काम व वाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन नंतर उपोषण समाप्त*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-मा. हंसराज भैय्या अहिर साहेब, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार चे तेलंगणा - महाराष्ट्र राज्य सिमा लगत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे दि. 16/10/2023 तारखे पासून श्री नेमिचंद विश्वनाथ काटकर ह्यांच Rccpl सिमेंट कंपनी मुकुटबन विरूद्ध , बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला दि.02/11/2023 ला भेट देऊन, उपोषणाकर्ता नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांना ज्युस पाजून उपोषण समाप्त करण्यात आले आहे. मागील १८ दिवसांपासून नेमिचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू होते. उपोषण कर्ता ची Rccpl सिमेंट कंपनी विरूद्ध 12 मागणी पुर्ण करण्यासाठी शासन व  प्रशासनाला मागणी होती, उपोषणकर्ताची ढासळते तब्येत पाहून मा, हंसराज भैय्या अहिर साहेब कडून उपोषणकर्ताची गंभीर तब्येत पाहून तातडीने   डॉक्टर टिम ला बोलावून तपासणी करण्यात आली. उपोषण स्थळी स्थानिक तहसीलदार कोरपना व पोलिस अधिकारी कोरपना ह्यांना बोलावून माहिती घेण्यात आले, परसोडा चुनखडी लिज क्षेत्र मध्ये बाधित गाव परसोडा,कोठोडा बु., रायपूर, गोविंद पुर,कोठोडा खु.,पाऊंडगुडा,मांगरूड, दुर्गाडी गावातील भरपूर स्थानिक लोक उपस्थित होते.    उपोषण कर्ता ची 12 पैकी प्रमुख मागणी संपूर्ण 756 हेक्टर जमीन अधिग्रहण विषय आहे. हे संपूर्ण मागणी येणाऱ्या, विभागीय आयुक्त नागपूर येथे, ओबीसी आयोग सुनावणी मध्ये घेऊन मा. हंसराज अहिर साहेब निर्णय देणार आहे.  तोपर्यंत लिज क्षेत्रातील संपूर्ण काम व वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी मार्फत तहसीलदार कोरपना ह्यांनी उपस्थित सर्व लोका समोर  घोषित केले आहे . ग्रामपंचायत ने कंपनी ला दिलेल्या बनावट खोटे सह्या अनुमतीचे चौकशी करून कारवाई करण्याबाबत पोलिस अधिकारी कोरपना ह्यांना मा. अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर साहेब यांनी म्हटले आहे. तहसीलदार कोरपना ह्यांनी ओबीसी आयोग बैठकीत निर्णय होईपर्यंत कंपनीचे काम बंद ठेवण्यात येणार असं औपचारिक घोषणा करण्यात आली त्या नंतर मा. हंसराज अहिर साहेब यांनी उपोषण कर्ता नेमीचंद काटकर  ह्यांना ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडविण्यात आले. ह्या वेळी श्री संजय धोटे माजी आमदार, श्री सुदर्शन निमकर माजी आमदार, श्री खुशाल भाऊ बोंडे,राजु घरोटे, किशोर बावणे, नारायण हिवरकर, गंगाधर कुंठावार, अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता, सखाराम तलांडे, सत्यपाल काटकर, उपसरपंच सतिश गोनलावार, कार्तिक गोनलावार, रामभाऊ कोहचाडे, मिलिंद काटकर, दिनेश आत्राम,राजु मैदमवार, मंगेश बांदुरकर, बालकुमार कांबळे, विनोद सिगुरलावार, साई जनगमवार, मंगेश नगराळे इ. लिज क्षेत्र बाधित ७गावातील  बरेचसे स्थानिक लोक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...