Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जनविरोधी, हुकुमशाही...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जनविरोधी, हुकुमशाही सरकारला धडा शिकवा : आमदार सुभाष धोटे* *कोरपना येथे काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा : हजारो नागरिक धडकले तहसिल कार्यालयावर, तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन*

*जनविरोधी, हुकुमशाही सरकारला धडा शिकवा : आमदार सुभाष धोटे*    *कोरपना येथे काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा : हजारो नागरिक धडकले तहसिल कार्यालयावर, तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन*

*जनविरोधी, हुकुमशाही सरकारला धडा शिकवा : आमदार सुभाष धोटे*

 

*कोरपना येथे काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा : हजारो नागरिक धडकले तहसिल कार्यालयावर, तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :-- कोरपना तालुका काँग्रेस तर्फे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात बस स्थानक ते तहसील कार्यालय कोरपना पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना पाठवण्यात आले. यात ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण न देणे, बिहार राज्याच्या धर्तीवर जात निहाय जनगणना करणे, ओबीसी मुलांचे बहात्तर वस्तीगृह सुरू करणे, दत्तक शाळा योजना निर्णय रद्द करणे, संजय गांधी निराधार योजना व वृद्धापकाळ योजना यांची रक्कम नियमित वितरित करणे, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे, अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामाप्रमाणे मदत मिळणे बाबत, समूह शाळा संकल्पना रद्द करणे आदी सह एकूण चौदा मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की, देश एका निर्णायक वळणावर उभा आहे. केंद्र व राज्य सरकार च्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. गाव ते शहर आणि गल्ली ते दिल्ली अनेक समस्या आवासुन उभ्या आहेत. सर्वसामान्य नागरिक तसेच समाजातील सर्वच घटकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. हे सरकार पुर्णपणे अयशस्वी आहे. त्यामुळे या जनविरोधी, हुकुमशाही सरकारला धडा शिकवा असे आवाहन जनतेला केले. उपस्थित मान्यवरांनीही नागरिकांना संबोधित केले.या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, बाजार समिती सभापती अशोक बावणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, नगराध्यक्ष नंदा बावणे, माजी सभापती श्याम रनदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, सीताराम कोडापे, सुरेश मालेकर, महिला तालुकाध्यक्ष आशा खासरे, गडचांदूर च्या नगराध्यक्ष सविता टेकाम, अभिजित धोटे,  भाऊराव कारेकर, गणेश गोडे, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, सचिन भोयर, विक्रम येरणे, अभय मुनोत, रऊफ खान वजीर खान, उमेश राजूरकर, इरफान शेख, मनोहर चन्ने, नितीन बावणे, इस्माईल शेख, प्रशांत लोडे यासह कोरपना काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...