Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *खांबाळा परिसरात दिवसाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*खांबाळा परिसरात दिवसाचे लोडशेडींग बंद* *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निवेदनाची दखल* *महावितरणचे कनिष्ठ अभियंता पिदुरकर यांनी दिली माहिती; दिवसाचा थ्री फेज वीजपुरवठा सुरू*

*खांबाळा परिसरात दिवसाचे लोडशेडींग बंद*    *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निवेदनाची दखल*    *महावितरणचे कनिष्ठ अभियंता पिदुरकर यांनी दिली माहिती;  दिवसाचा थ्री फेज वीजपुरवठा सुरू*

*खांबाळा परिसरात दिवसाचे लोडशेडींग बंद*

 

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निवेदनाची दखल*

 

महावितरणचे कनिष्ठ अभियंता पिदुरकर यांनी दिली माहिती;दिवसाचा थ्री फेज वीजपुरवठा सुरू

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा/भद्रावती:-दिनांक १८ ऑक्टोबर ला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांचे नेतृत्वात महावितरणचे उपविभाग खांबाळा येथील कनिष्ठ अभियंत्याला निवेदन देवून खांबाळा परिसरातील लोडशेडींग बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. याची दखल घेवून या परिसरात दिवसाचे  थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.आमचे प्रतिनिधीनी खांबाळा परिसरातील कनिष्ठ अभियंता श्री. पिदुरकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज (दि.०२ ऑक्टोबर) पासून दिवसाचे लोडशेडींग बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवसाचे थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.वरोरा तालुक्यातील खांबाळा परीसरात विजेचा मोठा लपंडाव सुरु होता. अगोदरच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात येणारे सोयाबीन पिक गेले. बळीराजा संकटात सापडला. आता दुसऱ्या पिकासाठी मशागत करून जमिन तयार करावी लागली. मात्र लोडशेडींगच्या नावाखाली विजेचा लपंडाव खेळ सुरु होता. तो बंद करावा अन्यथा वरोरा तालुक्यातील शिवसेना (उबाठा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी खांबाळा येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनातून दिला होता. सर्वप्रथम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी दिनांक १८ ऑक्टोबरला महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला दिवसा व रात्री थ्री फेज वीजपुरवठा करण्याबाबत निवेदन दिलेले होते. त्यानंतर परत २७ ऑक्टोबरला निवेदन देवून पाठपुरावा करण्यात आलेला होता. स्वतः शिवसेना पदाधिकारी महावितरणच्या संपर्कात होते.या निवेदनाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी खांबाळा चे कनिष्ठ अभियंता यांनी दिवसाची थ्री फेज वीजपुरवठा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे.हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यश आहे. त्यामुळे कुठल्याही खोट्या आंदोलनाला बळी पडू नये व वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. कोणत्याही शेतकऱ्याला महावितरण कडून त्रास असल्यास वरोरा येथील शिवालय या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...