Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / श्री संत नगाजी महाराज...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न. थोर संत महात्म्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे -- मा. हंसराजभैया अहिर (माजी.केंद्रियमंत्री)

श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न.      थोर संत महात्म्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे -- मा. हंसराजभैया अहिर (माजी.केंद्रियमंत्री)

श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न.

 

 

थोर संत महात्म्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे -- मा. हंसराजभैया अहिर (माजी.केंद्रियमंत्री)

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

भद्रावती : स्थानिक श्री संत नगाजी महाराज मंदिर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त दोन दिवस दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२३ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमात श्री ची घटस्थापना पुजा व पारायण लक्ष्मणराव चौधरी यांनी केले.महिला व मुलींकरीता विविध स्पर्धा, जागृती भजन.सामुदायीक ध्यान,गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार, पालखी सोहळा,शोभायात्रा,महिला संमेलन व बाल किर्तनकार ( दुरदर्शन कलाकार) भाविका खंडाळकर यांनी आपल्या सप्त खंजरीच्या आवाजातून समाज प्रबोधन करीत प्रेक्ष्यकांना मंत्रमुग्ध केले    या कार्यक्रमा करीता लाभलेले प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. गोपाल घुमे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन शिक्षणाचे  महत्त्व समजून दिले व आई वडिलांनी मुलांकरिता किमान दोन तास वेळ देऊन अभ्यास करून घेण्याचा सल्ला दिला. या वेळी मंचावर उपस्थित मा. अनिलभाऊ धानोरक माजी. नगराध्यक्ष भद्रावती, मा. रमेशजी राजूरकर निवडणूक प्रमुख भा. ज. पा. वरोरा भद्रावती विधानसभा, मा. प्रफुल्लभाऊ चटकी माजी उपनगराध्यक्ष, मा. मुकेशभाऊ जिवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख (उबाठा),युवा शिवसैनिक महेशभाऊ जिवतोडे,सामाजिक कार्यकर्ते मा. संजय राय,मा. सुरज शाहा शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी, माजी.नगरसेवक प्रशांत डाखरे होते. कार्यक्रमाला लाभलेले विशेष पाहुणे मा. माजी केंद्रीय मंत्री हंसराजभैया अहिर यांनी नाभिक समाजला शासकीय योजनांची माहिती देत अनेक थोर महात्म्यांच्या विचार डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन राजकारण व समाजकारण करण्याचे सुचविले .यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोशनी शेंडे,प्रास्ताविक उपाध्यक्ष हरीभाऊ घुमे यांनी तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष बंडु व्ही लांडगे यांनी मानले. यशस्वीते करीता सचिव सचिन नक्षीणे, सहसचिव सुरेश जमदाडे, सुधीर लांडगे, कार्याध्यक्ष रविंद्र हणुमंते, उपाध्यक्ष हरीभाऊ घुमे,पांडुरंग हणुमंते, कोषाध्यक्ष आशीष चौधरी, सतीश मांडवकर, संघटक सागर घुमे, प्रशांत नक्षिणे, सल्लागार प्रकाश दैवलकर,राजेश येसेकर, महिला अध्यक्ष सूरेखाताई अतकरे, उपाध्यक्षा प्रतिभाताई नक्षिणे, कार्याध्यक्ष रागिणी सुत्रपवार, सचिव मोनाताई जांभुळकर, सहसचिव मंजुताई मेश्राम कोषाध्यक्षा भुवनेश्वरी निंबाळकर,वर्षाताई वाटेकर,छायाताई जमदाडे,शोभाताई लांडगे,नंदणी लांडगे यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...