Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *जिल्हा युवक काँग्रेसची...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण व सत्कार*

*जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण व सत्कार*

*जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण व सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नियोजनात उत्कृष्टपणे पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रोहित कुमार, विशेष अतिथी चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश चोखारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव याज्ञवलक्य जिचकार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अश्विन बैस आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन युवक काँग्रेसच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हातील सर्व युवक तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि सत्कार सोहळा थाटात पार पडला.यात युवक काँग्रेस जिल्हा महासचिव पदी प्राजू शिंगरू, सचिन उपरे यांची तर चंद्रपूर तालुका महासचिव अतुल हागे, सचिव हर्षल येलमुले, नियुक्ती करण्यात आली. राजुरा विधानसभा अध्यक्ष उमेश गोनेलवार, उपाध्यक्ष अशोक राव, महासचिव रूपेश चुदरी, दिपक खेकारे, निरंजन मंडल, राजुरा यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, शहर उपाध्यक्ष श्रिकांत चिंतलवार, सचिव भुषण राठोड, गडचांदूर शहराध्यक्ष महावीर कथोड, शहर सचिव इंदर कश्यप, कोरपना तालुकाध्यक्ष प्रेम बोंडे, उपाध्यक्ष स्वप्नील माणूसमारे, कार्याध्यक्ष रोषण मरापे, गोंडपीपरी युवक तालुकाध्यक्ष विपीन पेद्दुलवार, उपाध्यक्ष शुभम पिंपळकर, बल्लारपूर विधानसभा महासचिव जितू चुदरी, तालुकाध्यक्ष अखिल गेडाम, शहराध्यक्ष अरविंद वर्मा, पोंभुर्णा युवक तालुकाध्यक्ष हेमंत आरेकर, मुल युवक तालुका उपाध्यक्ष हिमानी वाकुडकर, सिंदेवाही युवक तालुकाध्यक्ष अभिजीत मुप्पिडवार, सावली शहराध्यक्ष अमरदिप कोनपट्टीवार, नागभीड तालुकाध्यक्ष सौरव मुळे, चिमूर तालुकाध्यक्ष नागेंद्र चट्टे, शहराध्यक्ष अक्षय लांजेवार, आदींना नियुक्तीपत्र देऊन पदग्रहण सोहळा घेण्यात आला. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी रोहित कुमार यांनी आपल्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर काँग्रेसला बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. बुथ जोडो युथ जोडो अभियान अधिक व्यापक करण्याच्या सूचना दिल्या. तर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि येणाऱ्या काळात युवक काँग्रेसमध्ये नवीन युवक - युवतींना जोडून जिल्हात काँग्रेसमय वातावरण तयार करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, सुमित आरेकर, ऋषी मुके यासह जिल्हा युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...