Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / अंमली पदार्थाची वाहतुक...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक किंमत 19,80,000 चे M. D. (मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थासह 28,02,700 रू चा मुद्देमाल जप्त.

अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक किंमत 19,80,000 चे M. D. (मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थासह 28,02,700 रू चा मुद्देमाल जप्त.

 

पडोली: 

मा. पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन पडोली चौक येथे येणार आहे. सदर माहिती वरीष्ठांना देवुन सदर माहिती वरून पोलीस स्टेशन पडोली हददीत थांबुन असतांना एक चार चाकी वाहन ज्याचा क्रमांक एमएच-34- बीआर-5951 ही नागपुर कडुन चंद्रपूरच्या दिशेने येतांना दिसली. सदर चारचाकी वाहनास थांबवुन झडती घेतली असता, ड्रायव्हरचे सिटचे बाजुला बसलेला इसम नामे शाहरूख मतलुब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढऱ्या भुरकट रंगाचे पॉवडर M. D. (मॅफेड्रान) वजन 198 ग्रॉम किंमत 19,80,000/- रू तसेच त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार किंमत अंदाजे 500/- रू मिळुन आले.

 

सदर कार्यवाही दरम्यान दोन्ही आरोपी नामे 1) शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर 2) साहील ईजराइल शेख वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांचे ताब्यातुन 1) 198 ग्राम एमडी पॉवडर किंमत 19,80,000/- रू 2 ) दोन नग विव्हो कंपनीची मोबाईल किंमत 20,000/- 3) एक बलेनो कार एमएच-34-डीआर-5951 किंमत 8,00,000/- रू 4) आरोपीचे अंग झडतीत नगदी 2200/- रू5) एक लोखंडी तलवार किंमत 500/- रू असा एकुण 28,02,700/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही आरोपींनी अटक करून पो. स्टे. पडोली अप. क. 319 / 2023 कलम 8(क ), 21 (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 सकलम 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे तसेच पो स्टे सायबर चे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे.

 

 

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...