Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *कोलाम समाजाच्या उत्थानासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*कोलाम समाजाच्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. सुभाष धोटे* *भीमदेव मंदिर येथे कोलाम समाजाचा भव्य दसरा मेळावा उत्साहात साजरा*

*कोलाम समाजाच्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. सुभाष धोटे*    *भीमदेव मंदिर येथे कोलाम समाजाचा भव्य दसरा मेळावा उत्साहात साजरा*

*कोलाम समाजाच्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. सुभाष धोटे*

 

*भीमदेव मंदिर येथे कोलाम समाजाचा भव्य दसरा मेळावा उत्साहात साजरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :-- जिवती तालुक्यातील मानिकगड पहाडावरील ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या पुरातन व प्राचीन भीमदेव मंदिर देवस्थान मानिकगड येथे आदीम कोलाम समाजाचा भव्य दसरा मेळावा संपन्न झाला, यावेळी मान्यवरांचे हस्ते भीमदेव मंदिरांची विधिवत पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, उद्घाटक मुरुगानंथम, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रमुख पाहुणे अविनाश सेंबटवाड तहसीलदार, डॉ. भागवत रेजिवाड गटविकास अधिकारी, प्रा. सुग्रीव गोतावळे माजी सभापती, राजेश राठोड उपसरपंच ग्रामपंचायत खडकी रायपूर, सर्व सदस्य गण व ज्येष्ठ नागरिक नानाजी पाटील मडावी, मारू पाटील आत्राम, जालीम पाटील कोडापे, जयतु पाटील, पुजारी आयु पाटील कोडापे, मारू जंगू कुडापे, भीमा मुद्दा कोडापे, ग्रामसेवक विनोद शेरकी, पटवारी गोवर्धन, व तालुक्यातील बेचाळीस गुड्या वरील सर्व गाव पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील तरुण, युवक मंडळी मोठ्या उत्साहाने या मेळाव्यात सामील झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिम कोलाम बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सुरेश कोडापे यांनी कोलामी भाषेत समाजाला मार्गदर्शन केले व स्थानिक समस्या मान्यवर मंडळीच्या पुढे सांगितल्या व त्या पूर्णत्वास नेण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली. या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, सर्व समाजांचा थोड्याफार प्रमाणात विकास झाला परंतु आदिवासी समाजामधील आदिम कोलाम बांधवांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही तेव्हा या समाजाने जागृत होणे गरजेचे आहे. मी कोलाम समाजाच्या हितासाठी प्रयत्न करीत असून या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी, उत्थानासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. समाजाने केलेल्या विविध मागण्या आपण पुर्ण केल्या आहेत. उर्वरित मागण्याही लवकरच पूर्ण करू, वन हक्कांचे पट्टे माझ्याच काळात मोठ्या प्रमाणात आदीम बांधवांना वाटप केले. त्यांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा व शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊन उन्नती करावी असे विचार व्यक्त केले तर उद्घाटनपर मार्गदर्शन करताना मुरुगानंथम  साहेब म्हणाले की, आदिवासी समाजातील आदिम कोलाम बांधवांनी इतर समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावे व शिक्षणाकडे पूर्ण लक्ष देऊन प्रगती करावी, शासन तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु तुम्ही त्या प्रवाहात येत नाही अशी खंतही व्यक्त केली. सर्वांनी आता समोर येऊन आपल्या समस्या मागण्या ह्या मांडल्या पाहिजे  तरच तुमच्या व्यथा आम्हाला, व्यवस्थेला व इतरांना कळेल व पुढच्या काळात अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यातून बनावे असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व कोलाम बांधवांचा इतिहास प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार राजेश राठोड यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव टेकाम, मारुती  कोडापे,आनंद मडावी ,पंकज कोडापे , लच्चू मडावी, माणिक कोडापे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला कोलाम समाज बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...