Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *संतांच्या शिकवणूकीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*संतांच्या शिकवणूकीत सापडतो मानवकल्याणाचा मार्ग : आमदार सुभाष धोटे* *तोहोगाव येथे महर्षी वाल्मिकी महाराज मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना*

*संतांच्या शिकवणूकीत सापडतो मानवकल्याणाचा मार्ग : आमदार सुभाष धोटे*    *तोहोगाव येथे महर्षी वाल्मिकी महाराज मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना*

*संतांच्या शिकवणूकीत सापडतो मानवकल्याणाचा मार्ग : आमदार सुभाष धोटे*

 

*तोहोगाव येथे महर्षी वाल्मिकी महाराज मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपीपरी :--  महर्षी वाल्मिकी भोई समाज मंडळ तोहोगाव यांच्या विद्यमानाने तसेच महर्षी वाल्मिकी महाराज जयंती निमित्त मोजा तोहगाव येथे महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भोई समाज मंदिर, तोहगाव येथे करण्यात आली. यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित राहून महर्षी वाल्मिकी महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेतले, विधीवत पुजन केले. या प्रसंगी जागृती भजन, पूजापाठ, हवनविधी, घटस्थापना, पालखी सोहळा, किर्तन, गोपाळकाला, महाप्रसाद विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांना संबोधित करताना आ. धोटे यांनी सांगितले की, महर्षी वाल्मिकी महाराज तसेच सर्व संत पुरुषांच्या शिकवणूकीत मानव कल्याणाचा मार्ग सापडतो. संत, महात्म्यांपासून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी प्रगती साधली पाहिजे. भोई समाजाच्या विविध मागण्या आपण पुर्ण केलेल्या असून आनखी काही मागण्या समाजबांधवांनी केल्या आहेत. त्या देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भोई समाजाचे अध्यक्ष रामदास महाराज भोयर  ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा कळमना चे सरपंच नंदकिशोर वाढई, तोहगाव चे उपसरपंच मदन खामकर, ग्रा. प. सदस्य पोर्णिमा भोयर,वनिता रागीट,उज्वला ठेंगणे,नीलकंठ मोरे,लाठी चे उपसरपंच साईनाथ कोडापे, वेजगावचे माजी सरपंच नरेंद्र वाघाडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ रागीट,माजी उपसरपंच फिरोज पठाण, प्रवीण मोरे,भोई समाज मंडळ चे उपाध्यक्ष रामदास वाघाडे, सचिव दशरथ शेंडे,सुरेश वाघाडे,विजय वाघाडे,विजय भोयर,मधुकर शेंडे,दत्तात्रय भोयर,संजय भोयर,भास्कर भोयर यासह भोई समाज बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन फिरोज पठाण यांनी केले तर प्रास्ताविक दशरथ शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नील बावणे यांनी केली.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...