आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भोई-ढिवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटीबद्ध- देवराव भोंगळे
घुग्घुस येथील आई एकविरा मासेमारी भोई-ढिवर समाज संस्था घुग्घुस तथा भोई-ढिवर समाज बांधवांतर्फे शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता विठ्ठल मंदिर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव भोंगळे निवडणुक प्रमुख राजुरा विधानसभा, विशेष अतिथी विवेक बोढे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष, प्रमुख अतिथी शीतल कामतवार कार्यरत अधिकारी व समाज सेविका, जेष्ठ नागरिक चंद्रकांत चौधरी, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, सुरेश बोबडे, संजय भोंगळे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना देवराव भोंगळे निवडणुक प्रमुख राजुरा विधानसभा म्हणाले, भोई-ढिवर समाजाच्या विकासासाठी भाजपा सदैव कटीबद्ध आहे. त्याअनुषंगाने भोई-ढिवर समाज बांधवांच्या आर्थिक प्रगतीसाठी वेकोलिच्या १० एकर जागेवर मासेमारी साठी तलावाची निर्मिती करण्यात आली आहे हा तलाव सर्व समाजाचे आहे. महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे रचेते होते. वाल्याचा वाल्मिकी झाला वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाकडे गेले. समाजाच्या प्रगतीसाठी युवकांनी पुढे यावे. समाजातून व्यसन सोडण्याचे काम करावे लागणार आहे. समाजातील युवकांनी व्यसन सोडावे अनेक वर्षांनी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली याचा मला आंनद होत आहे. मी सर्व समाज बांधवांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा देतो. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, समाज सेविका शीतल कामतवार व समाजाचे बबन पारशिवे यांनी आपले विचार व्यक्त केले.
शिवशक्ती महिला भजन मंडळाच्या जनाबाई निमकर, बेबी नागतुरे, माया मांडवकर, सुशीला डकरे, संध्या जगताप, दीपक पोंडे यांनी भजन सादर केले.
संचालन शंकर नागपुरे यांनी केले.
यावेळी भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहणे, सतीश बोन्डे, अमीना बेगम, किशोर नागतुरे, भोई-ढिवर समाजाचे बबन पारशिवे, दीपक कामतवार, अमोल नागपुरे, रितेश मांढरे, गजानन पारशिवे, गजानन कामतवार, विजय कामतवार, परमेश्वर कामतवार, गणेश कामतवार, दिलीप कामतवार, रोशन पचारे, रतन शिंदे, कविता कामतवार, शीतल कामतवार, अशा कामतवार, राजू कामतवार, विशाल नागपुरे, प्रकाश पचारे, सुनील कामतवार, शंकर कामतवार, संतोष कामतवार, वाल्मिक मांढरे, रामदास दिघोरे, घनश्याम कामतवार, शंकर कार्लेकर, किरण कामतवार, सुनील मांढरे, नत्थू कामतवार, कला कामतवार, प्रतीक्षा कामतवार, निर्मला कामतवार, विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटीचे योगेश होकम,स्वप्नील वाढई, ललित होकम, हेमराज बावणे, निखिल मोहितकर, अमित चिकनकर, गीता क्षीरसागर, स्नेहा झाडे, अनिता पिंपळकर,प्राची चटकी व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...