Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *मंगी बु. येथे आ. सुभाष...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*मंगी बु. येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते जिल्हातील पहिल्या सायन्स पार्कचे लोकार्पण.* *सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - आमदार सुभाष धोटे.* *चंद्रपूर जिल्ह्य़ात २८ जि. प. शाळेत उभे राहणार ओपन सायन्स पार्क - विवेक जाॅनसन.*

*मंगी बु. येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते जिल्हातील पहिल्या सायन्स पार्कचे लोकार्पण.*    *सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - आमदार सुभाष धोटे.*    *चंद्रपूर जिल्ह्य़ात २८ जि. प. शाळेत उभे राहणार ओपन सायन्स पार्क - विवेक जाॅनसन.*

*मंगी बु. येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते जिल्हातील पहिल्या सायन्स पार्कचे लोकार्पण.*

 

*सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - आमदार सुभाष धोटे.*

 

*चंद्रपूर जिल्ह्य़ात २८ जि. प. शाळेत उभे राहणार ओपन सायन्स पार्क - विवेक जाॅनसन.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :--  राजुरा तालुक्यातील मौजा मंगी बुजृक येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ओपन सायन्स पार्कचे (विज्ञान बाग) लोकार्पण करण्यात आले. यावेळी सोहळ्यात त्यांचे हस्ते *गैव्हिटी चेअर (गुरूत्व खुर्ची)* या वैज्ञानिक प्रतिकृतीचे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच राजुरा तालुक्यातील एकूण २० जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती, माॅडेल विषयी अतिशय सुरेख सादरीकरणासह उपयुक्त माहिती दिली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम सादरीकरणाचे, शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.  प्रसंगी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर ,  मीना साळुंखे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर, राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प. चंद्रपूर तथा प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर,  हेमंत भिंगारदेवे, संवर्ग विकास अधिकारी, पं. स. राजुरा, प्रभारी कार्यकारी अभियंता विनोद खापणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रिकांत बोबडे, सटाले मॅडम , मंगी बु. चे सरपंच शंकर तोडासे, उपसरपंच वासुदेव चापले, भेंडवी चे सरपंच श्यामराव कोटनाके यासह अनेक अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, गनमान्य नागरिक उपस्थित होते.यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, जिल्ह्य़ातील सर्व ओपन सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. आजपर्यंत नागपूर किंवा अन्य दूर ठिकाणी सहल नेऊन विद्यार्थ्यांना विज्ञान प्रतिकृती दाखवाव्या लागायच्या मात्र आता आपल्या जिल्हात, राजुरा तालुक्यातील मंगी बु व अन्य तीन ठिकाणी अतिशय सुंदर सायन्स पार्क निर्माण होत आहेत. हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, अभिरुची वृद्धिंगत होण्यास मदत होईल. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्य़ात २८ जि. प. शाळेत ओपन सायन्स पार्क उभे राहणार असून विज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शालेय क्रीडा तसेच आवश्यक सर्व उपक्रमांना चालणा व प्रोत्साहन देण्यात येईल. शिक्षकांनी राष्ट्र निर्माणासाठी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यात योगदान द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी केले. सुत्रसंचालन गीता जाम्बुलवार, ज्योती गुरुनुले यांनी केले तर आभार प्रदर्शन परशुराम तोडासे यांनी मानले. या प्रसंगी राजुरा तालुक्यातील सर्व २० जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मंगी बु चे नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...