Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *खेडा पद्धतीने शेतमाल...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*खेडा पद्धतीने शेतमाल खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करणार :* *भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय*

*खेडा पद्धतीने शेतमाल खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करणार :*    *भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय*

*खेडा पद्धतीने शेतमाल खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करणार :*

 

*भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  उपबाजार आवार चंदनखेडा या हद्दीत विनापरवाना व्यापाऱ्यांनी खेडा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नये.अन्यथा असा प्रकार आढळल्यास त्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत  नुकत्याच आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या   बैठकीत घेतलेला आहे.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाठविलेल्या पत्रकात असे नमुद करण्यात आले की,  शेतकऱ्यांचे सोयाबीन, धान,तुरी,व चना या मालाचे खरेदी- विक्रीचे व्यवहार उपबाजार आवार,चंदनखेडा येथे लिलाव पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. काही  व्यापारी मंडळींकडून  विनापरवाना शेतकऱ्यांना भुलथापा देऊन निघालेला माल खरेदी करण्याचा प्रकार तालुक्यातील काही भागात सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समिती ,भद्रावतीचे उपबाजार आवार,चंदनखेडा हद्दीतील व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती  अश्लेषा (भोयर) जीवतोडे आणि सर्व संचालक तसेच  सचिव  नागेश पुनवटकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात  आली. उपबाजार आवार ,चंदनखेडा येथे लवकरच शेतमालाच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार लिलाव पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे .खेड्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत असते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यात सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला जातो. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी भद्रावती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती,भद्रावतीचे उपबाजार आवार, चंदनखेडा येथे विक्रीस आणावा, यासंबंधीच्या सुचना शेतकरी बांधव आणि  व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती सभापती  भास्कर ताजने ,उपसभापती अश्लेषा (भोयर ) जीवतोडे व सचिव नागेश पुनवटकर यांनी संयुक्तपणे  दिली आहे.

ताज्या बातम्या

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* 01 February, 2025

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी. 01 February, 2025

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी.

वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...