Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती, सावली तर्फे सम्राट अशोका विजयादशमी कार्यक्रम संपन्न* *सावली तालुका समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास विशेष मानवंदना*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती, सावली तर्फे सम्राट अशोका विजयादशमी  कार्यक्रम संपन्न*    *सावली तालुका समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास विशेष मानवंदना*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती, सावली तर्फे सम्राट अशोका विजयादशमी  कार्यक्रम संपन्न*

 

*सावली तालुका समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास विशेष मानवंदना*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- आज सावली शहरात सम्राट अशोका विजयादशमी/ प्रथम धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती, सावली व सावली तालुका समता सैनिक दलातर्फे ध्वजारोहण व मानवंदनेचा कार्यक्रम राबविण्यात आला.सम्राट अशोक हे भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते.त्यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचे लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता.आपल्या सुमारे ४०वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण,पाकिस्तान,पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत.कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला,आपल्या सैन्याचे रक्तरंजित व हाहाकार बघता ते अस्वस्थ झाले होते व त्यांनी तलवारिचा त्याग करून तथागत गौतम बुद्ध यांना शरण गेले व दसऱ्याच्या दिवशी आपल्या राज्यातील जनतेसोबत कोणावरही बळजबरी न करता बौद्ध धर्माचे चक्र संपूर्ण जगात फिरविले.व सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन घडवून बौद्ध धम्माला पुनुरुजिवन प्रदान केले होते.आज सम्राट अशोका विजयादशमीच्या पावन पर्वावर जेष्ठ बौद्ध समाज बांधव आयु.नानाजी बोरकर,आयु.अर्जुन गेडाम,आयु.विजय गोंगले यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले. व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.सावली तालुका समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास व महान सम्राट अशोक तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस मानवानंदना देण्यात आली व विंग कमांडर आयु.मयूर दुधे यांच्या कडून उपस्थित बौद्ध समाज बांधव यांना भारतीय संविधान व देशासाठी समर्पित राहण्यासाठी शपथ देण्यात आली.याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती,सावलीचे अध्यक्ष आयु.गुणवंत दुधे, सावली तालुका समता सैनिक दलातर्फे तालुका अध्यक्ष आयु.गिरजाशंकर दुधे, शहराध्यक्ष आयु.आशिष गेडाम, नगरपंचायत सावलीचे पाणी पुरवठा,आरोग्य व स्वच्छता सभापती आयु.अंतबोध बोरकर, आयु.कमलेश गेडाम, समता सैनिक दलाचे सचिव आयु.साक्षी बोरकर, बोधिक प्रमुख आयु.राहुल उंदीरवाडे, आयु.पवन मेश्राम,आयु.कुणाल गेडाम,आयु.प्रणित कोसनकर,आयु.तेजस्विनी मेश्राम आणीआयु.विशाखा दुधें तसेच बौद्ध समाज बांधव उपासक व उपासिका जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...