Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना ( उध्दव बाळासाहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे वैष्णवी पाचभाईच्या चेहऱ्यावर हास्य फूलले... !* *नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली : आई -वडीलांकडून कृतज्ञता व्यक्त*

*शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे वैष्णवी पाचभाईच्या चेहऱ्यावर हास्य फूलले... !*    *नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीचे  प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली   : आई -वडीलांकडून कृतज्ञता व्यक्त*

*शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे वैष्णवी पाचभाईच्या चेहऱ्यावर हास्य फूलले... !*

 

*नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीचे  प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली   : आई -वडीलांकडून कृतज्ञता व्यक्त*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

  भद्रावती:-तालुक्यातील खापरी येथील वैष्णवी सुनील पाचभाई ह्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीला  तिचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था   शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून केली. रविंद्र शिंदे यांनी  प्रसंगावधान ठेवीत केलेल्या सहकार्यामुळे वैष्णवीच्या चेहऱ्यावर अप्रतीम हास्य फूलले. आज दि. २२ ऑक्टोंबर रोजी वैष्णवीच्या आईवडीलांनी रविंद्र शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी भद्रावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वास कोंगरे व युवा सामाजिक कार्यकर्ते उमेश काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

लेकीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रविंद्र शिंदे यांच्या रूपाने आमच्या मदतीला देवदुतच धावून आले. कदाचित त्यांनी वैष्णवीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली नसती ,तर आमच्या वैष्णवीचा प्रवेश या वर्षी झाला नसता. तिचे एक  वर्ष वाया गेले असते. रविंद्र शिंदे यांनी दिलेले सहकार्य   आम्ही विसरू शकत नाही. तसेच  त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड सुध्दा आम्ही कदापिही करू शकणार नाही. आम्ही त्यांचे खुप खुप आभारी आहोत. अशी कृतज्ञता वैष्णवीची आई भारती आणि वडील सुनिल पाचभाई यांनी  याप्रसंगी  व्यक्त केली.

  खापरी येथील सुनिल पाचभाई हे हात ठेल्यावरुन भाजीपाला विकतात. त्यांच्या कुटुंबात स्वतः कुटुंब प्रमुख सुनिल पाचभाई  , पत्नी भारती , मुलगी वैष्णवी आणि मुलगा वैभव असे एकूण चार सदस्य आहे. सुनिल यांच्या डाव्या हाताला यापूर्वी इजा पोहचली आहे. तरी सुध्दा आपली मुलगी व मुलगा शिकला पाहीजे. त्यांचे जिवन घडविण्यासाठी पाचभाई दाम्पत्य अहोरात्र कष्ट करीत आहे. परंतु वाढत्या महांगाईच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे  त्यांना अत्यंत अवघड जात आहे.

मुलगी वैष्णवी  हिला बी.एस्सी. प्रथम वर्ष  नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नागपूर हिंगणा येथील आकार बहुउद्देशीय संस्थेत प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाल्याने पाचभाई कुटूंबात आनंदी लहरी बहरू लागल्या. परंतु प्रवेश घेण्यासाठी लागणारे प्रवेश शुल्क भरण्यासाठीची रक्कम कशी जमवायची ?  या काळजीने पाचभाई कुटूंबाचा आनंद मावळण्यास सुरुवात झाली. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक  कार्याची माहिती कुणीतरी सुनिल पाचभाई यांच्या कानावर टाकली.  आणि.अखेर आशेचा किरण पाचभाई कुटुंबाला गवसला.  

लेकीच्या शैक्षणिक  प्रवेशाची चिंता वाढल्याने, सुनिल  पाचभाई आणि  त्यांच्या पत्नी भारती यांनी  मुलगी वैष्णवीसह भल्या सकाळीच रविंद्र शिंदे यांचे निवासस्थान गाठले. रविंद्र शिंदे यांना पाचभाई दाम्पत्यांनी आपली आपबीती कथन केली. लेकीचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी कृपया काहीतरी व्यवस्था  करा, अन्यथा वैष्णवीचा प्रवेश होणार नाही, तिचे एक वर्ष वाया जाईल अशी विनंती पाचभाई दाम्पत्यांनी या प्रसंगी केली. रविंद्र शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावला. पाचभाई कुटुंबाला धिर दिला. तसेच वैष्णवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची  व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली. तसेच यापुढे सुध्दा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पाचभाई दाम्पत्यांसह वैष्णवीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वैष्णवीचे बी.एस्सी. प्रथम वर्ष  नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली. आता  वैष्णवीचा प्रवेश सुध्दा निश्चित झाला. वैष्णवीचे वर्ग सुध्दा सुरू झाले. वैष्णवीचा मोठा भाऊ  वैभव हा चंद्रपूरच्या शासकीय इंजीनीअरींग कॉलेजचा संगणक शाखेतील तीसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

*यापूढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विकासाची संधी मिळालीच पाहीजे : रविंद्र शिंदे*कुठल्याही कुटूंबातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकी विकासापासून दूर राहता कामा नये. त्यांचा सर्वंकष विकास झालाच पाहीजे.त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा लाभ समाजाला निश्चितच होईल. वैष्णवी सारख्या असंख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना विकासाची संधी मिळत नाही. काही समस्या व अडचणी असल्यास नि : संकोचपणे संपर्क साधावा. यापुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विकासाची संधी मिळालीच पाहीजे . असे प्रतिपादन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख  रविंद्र शिंदे यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...