*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-परसोडा फाटा (तेलंगणा -महाराष्ट्र सिमा), तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, येथे Rccpl सिमेंट कंपनी व प्रशासन अधिकारी विरूद्ध श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच परसोडा ग्रामपंचायत अधिकार क्षेत्र वाचविण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. आज अन्नत्याग उपोषणाला पाचवे दिवस असुन शासन व प्रशासन अधिकारी ना जाग आल्याचं दिसत नाही. उपोषण कर्ता नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच तब्येत खालावली आहे, परंतु प्रशासन अधिकारी ह्या विषयावर गंभीर दखल घेताना दिसत नाहीत. काल स्थानिक आमदार सुभाष धोटे व तहसीलदार कोरपना हे उपोषण स्थळी भेट देऊन कंंपनीचे शाम माहेश्वरी अधिकारी ना उपोषण स्थळी बोलविले. आमदार धोटे समोर, कंपनी अधिकारी,शाम माहेश्वरीने लिज क्षेत्रातील संपूर्ण जमिनी खरेदी बाबत नकार दिला, दलाल खरेदी जमीन वर उत्खनन करू असं म्हटलं, पेसा अनुसूचित ग्रामपंचायत क्षेत्रात कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी न करता ,दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी केली आहे, व तया वर उत्खनन करत गाव रस्ता खराब केले आहे, कंपनी लिज क्षेत्रातील एका जमीन ला 35 लाख व दुसऱ्या जमीन ला 17 लाख रुपये किंमत लावून,लिज क्षेत्रातील जमीन मध्ये भेदभाव करून शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे, ग्रामपंचायतने कंपनी ला गाव रस्ता अवजड वाहतुकीसाठी अनुमती दिला नसताना, कंपनी जबरदस्ती ने अवजड वाहतूक करून रस्ता खराब केले आहे, कंपनीने लिज क्षेत्रातील संपूर्ण भूसंपादन करने व गाव रस्ता न वापरता पर्यायी रस्ता बनवून घेणे हे प्रमुख मुद्दे कंपनी मान्य करण्यास तयार नाही. स्थानिक आमदार सुभाष धोटे यांनी कंपनी ला गाव रस्ता वापरू द्यावा,ते रस्ता दुरुस्त करून देतील असे म्हणत शेतकर्यांचे तोंडाला पाने पुसण्याचा काम केले आहे. मध्यरात्री गाव रस्ता वर, कंपनीचे अवैध अवजड वाहतूक गावकरी थांबविले तर गावकरीवरच गुन्हा दाखल करू असं पोलिस अधिकारी द्वारा म्हटले जाते आहे, ग्रामपंचायत व गावकरी चे अनुपस्थितीत उपविभागीय अधिकारी राजूरा ह्यांनी बैठक घेऊन कंपनी हितासाठी तातडीची निर्णय घेत आहेत, ह्या वरून आमदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी राजूरा, तहसीलदार, पोलिस अधिकारी कोरपना हे सर्व कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत, परसोडा गाव रस्ता कंपनी ला देण्यासाठी जोर देताना दिसत आहेत कंपनी ने पेसा अनुसुचित ग्रामपंचायत फसवणूक व शेतकरी फसवणूक संदर्भात बोलताना हे नेते व प्रशासन अधिकारी दिसले नाही. फक्त कंपनी हिताचे विचार करताना दिसत आहेत. हे सर्व कंपनीचे गुलाम बनले आहे का असा उपस्थित लोकांना प्रश्न उपस्थित होतो आहे, मागितली दोन वर्षांपासून ह्या फसवणूक संदर्भात अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा अनेक निवेदन, जिल्हा प्रशासन अधिकारी ला दिले, अनेक तक्रारी राष्ट्रपती, पंतप्रधान आफिस, वरिष्ठ स्तरावरून, कार्यवाही करण्या साठी जिल्हा प्रशासन अधिकारी ला पाठविले परंतु जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यवाही करताना दिसत नाहीत. ह्या संदर्भात , न्याय मिळताना दिसत नाहीत म्हणून,श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच आज, बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला पाचवे दिवस असुन,जिल्हा प्रशासन गंभीर दखल घेताना दिसत नाहीत. असे अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...