Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *महाकाली महोत्सवात...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*महाकाली महोत्सवात "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचे आयोजन*

*महाकाली महोत्सवात

*महाकाली महोत्सवात "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागड च्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या  "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचा प्रयोग दि . २१ ऑक्टोंबर २०२३ ला दु . २ वा. चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात भव्य दिव्य स्वरुपात सादर होत असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने या नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत आहेत.

 झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून, प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी  त्यांच्या लोकजागृती संस्था, चंद्रपूर च्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे.सिनेस्टार मुन्ना बिके, निखिल मानकर, राजरत्न पेटकर,  संजीव रामटेके, सुरज चौधरी, गुरू मोहूर्ले, अविनाश कडूकर, अमित दुर्गे, यश शेंडे, वेदांत मेहता, अंकुश शेडमाके, भाष्कर मडावी, शुभम गुरनुले, गणेश मडावी, मयुर मस्के, अनुराग मुळे, स्नेहल वाडगुरे इ. पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम, रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे, प्रियंका सिडाम, माधुरी ढोरे, मनिषा बावणे, प्रविण लाडवे, संजना येलेकर, राजश्री, स्मिता, भावना इत्यादी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली यांचे "नाट्य प्रशिक्षण शाळेत" प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत. रेला नृत्य, आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर साकारणारे क्रांतियुध्द अंगावर रोमांच उभे करणारे आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...