Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *बेमुदत अन्नत्याग आमरण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला चौथा दिवस, उपोषणकर्तेची तब्येत खालावली*. *प्रशासन अधिकारी झोपेत. उपोषण समोर मध्यरात्री अवैध अवजड वाहतूक सुरू करून उपोषण विरूद्ध कुरघोडी करण्याचा कंपनीचा डाव.* *रात्रभर पाळत ठेवून ग्रामपंचायत सरपंच (महिला)कडून अवैध अवजड वाहने पकडण्यात आले आहे*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला चौथा दिवस, उपोषणकर्तेची तब्येत खालावली*.  *प्रशासन अधिकारी  झोपेत. उपोषण समोर मध्यरात्री अवैध अवजड वाहतूक सुरू करून उपोषण विरूद्ध कुरघोडी करण्याचा कंपनीचा डाव.*    *रात्रभर पाळत ठेवून  ग्रामपंचायत  सरपंच (महिला)कडून अवैध अवजड वाहने पकडण्यात आले आहे*

*बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला चौथा दिवस, उपोषणकर्तेची तब्येत खालावली*.

*प्रशासन अधिकारी  झोपेत. उपोषण समोर मध्यरात्री अवैध अवजड वाहतूक सुरू करून उपोषण विरूद्ध कुरघोडी करण्याचा कंपनीचा डाव.*

 

*रात्रभर पाळत ठेवून  ग्रामपंचायत  सरपंच (महिला)कडून अवैध अवजड वाहने पकडण्यात आले आहे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-परसोडा व कोठोडा बु. तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर,हे  दोन पेसा अनुसूचित ग्रामपंचायत अधिकार क्षेत्र वाचविण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांना , Rccpl सिमेंट कंपनी व स्थानिक व  जिल्हा प्रशासन विरूद्ध न्याय मिळवून देण्यासाठी, नेमीचंद काटकर चे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे.  दि.19/10/2023. आज श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला 4 था दिवस असुन त्यांचे तब्येत बिघडते आहे, परंतु कोणीही प्रशासन अधिकारी तहसीलदार सुद्धा उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आले नाही. प्रशासन अधिकारी,सिमेंट कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत ग्रामपंचायत अधिकार क्षेत्र चे पायमल्ली करत आहे. कंपनी विरूद्ध कार्यवाही न करण्यासाठी,प्रशासन अधिकारी वर स्थानिक व मंत्री चा दबाव आहे का असा प्रश्न स्थानिक लोकांना उपस्थित होतो आहे. बेमुदत अन्नत्याग उपोषणाला चौथ्या दिवस असुन ही प्रशासन अधिकारी गंभीर दखल घेऊन उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येत नाही, हे प्रशासन अधिकारी, कंपनी व मंत्री चे गुलाम बनले आहे का असा प्रश्न सर्व सामान्यांना उपस्थित होतो आहे. बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू असताना आज  मध्यरात्री 1.00 वाजता, कंपनीने बडजबरीने लपून छपून दहा ते बारा दगड भरलेले अवजड वाहतूक वाहने गाव रस्ता वरून काढण्यासाठी कंपनी चे प्रयत्न झाले. परंतु परसोडा ग्रामपंचायत सरपंच सौ गिरीजा ताई रामभाऊ कोहचाडे, उपसरपंच सतिश गोनलावार, रामभाऊ कोहचाडे, सखाराम तलांडे,निकेश केतकर, विनोद सिगुरलावार इ.बरेचसे स्थानिक लोकांनी कंपनी चे प्रयत्न उधळून लावले. त्यापैकी Vccpl कंपनी चे MH 34BZ 3947 ही ओवरलोड अवजड वाहतूक गाडी ग्रामपंचायत सरपंच व उपस्थित स्थानिक लोकांनी पकडले व पोलिसांना ह्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कळविले आहे. परसोडा फाटा येथे ग्रामपंचायत कडून ओवरलोड अवजड वाहतूक प्रवेश बंदी बाबतीत बोर्ड लावले असताना कंपनी जबरदस्ती ने अवजड वाहतूक गाव रस्ता वर करत आहे. बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण शांतपणे चालू असताना कंपनी जबरदस्ती ने गाव रस्ता वर वाहने पाठवून उपोषणा विरूद्ध कटकारस्थान करण्याचं प्रयत्न करत आहे. मध्यरात्री जबरदस्ती ने कंपनी कडून होणारे गाव रस्ता वर चे अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री ह्या क्षेत्रात गस्त घालून अवैध अवजड वाहतूक वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सर्व ग्रामस्थांची पोलिस प्रशासन ला मागणी आहे.  स्थानिक तहसीलदार कोरपना द्वारा, उपोषण स्थळी भेट घेऊन उपोषण कर्ते ची तब्येत विचारणा का केली जात नाही? प्रशासन अधिकारी कोणत्या मंत्री चे दबावाखाली तर येत नाही ना असं प्रश्न सर्व सामान्यांना उपस्थित होतो आहे. उपोषण शांतपणे चालू असताना, कंपनी ने बेकायदेशीर अवजड वाहतूक सुरू करून, उपोषण विरूद्ध कुरघोडी करण्याचा कंपनीचा प्रयत्न दिसतो आहे, तरी,शासन, प्रशासन ने बेमुदत अन्नत्याग उपोषण ची तात्काळ दखल घेऊन कंपनी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी ह्या माध्यमातून केला आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...