Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *व्वा दादा व्वा.... आपली...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*व्वा दादा व्वा.... आपली महिमा अपरंपार आहे*

*व्वा दादा व्वा.... आपली महिमा अपरंपार आहे*

*व्वा दादा व्वा.... आपली महिमा अपरंपार आहे*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

स्वताचे कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रस्थापित तथाकथित नेत्यांना धडकी भरवणारी तुमची किमायच न्यारी.. काय तुमचा थाट..काय तुमचे कार्यकर्ते.. अहो हे सगळं तुम्ही शिकले कुठुन? ज्यांचे मार्गदर्शन तुम्ही सतत घेत असता.. उठता बसता मुखी ज्यांचे नाव घेता त्यांना सुद्धा हेवा वाटेल असाच तुमचा बाना.. बरे असो राजकारण करायचे म्हणजे येळा गबळ्याचे काम असते काय? ही कला तुम्ही अवगत केली तर कुणाच्या पोटात का बरं दुखावे? नतद्रश्ट मेले.. अहो तुम्हाला आमदारकीचे वेध लागले हा काय तुमचा दोष? भले भल्यांचे आयुष्य सरले परंतु ते स्वप्न तुम्हाला ऐन उमेदीच्या काळात पडले हे या पामराना बघवत नाही हो.. पण तुम्ही नेटाने उभे रहा.. राजुर्याची जनता तुम्हाला नक्की साथ देईल. जवळची साठवलेली पुंजी या कामी नाही तर कधी येईल. त्यांना तुम्ही दांडियाच्या माध्यमातून जो व्यासपीठ उभा करून दिला हे आजपर्यंत राजुरा शहरात कुणाला जमले काय? किती प्रेमाने आपण मुख्याध्यापकांना दांडीयाची महिमा समजून त्यांना मोहीत केले, की ज्या शाळेत आजवर कधी कुठले लग्न सोहळे, किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव कार्यक्रमांना नो एंट्री होती. ती परंपरा मोडून चक्क शाळेच्या 'यावे ज्ञानासाठी - निघावे सेवेसाठी' या दर्शनी भागावरील घोष वाक्याला दबवून आपल्या 'दांडीयाचा ऊदो ऊदो करणारा भला मोठा प्रवेश गेट बसविला हे काय ऐऱ्या गबाळा चे काम आहे काय....?, बाजूला शाळा असेल किंवा रुग्णालय असेल या लोकांना डिजे काय असतो हे केव्हा कळेल.. अहो दादा .. तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावे असेच कार्य तुम्ही करत आहात.. अगदी तुमच्या डीजे च्या बाजूला महिलांचे प्रसूती गृह आहे. प्रसव कळा सुरू असताना वाजणारा डीजे त्या पहीलटकरणीचे दुःख विसरायला मदत करीत आहे. आणि मुख्य म्हणजे जन्माला येणारे बाळ डिजे चा ताल धरून जन्माला येत आहे. भलेही ध्वनी प्रदूषणाचे नियम घालून दिले असतील पण ते तुम्ही का मानावे. उलट जन्म झाल्या बरोबर बाळाची श्रवणशक्ती इतकी मजबूत होत आहे की मोठा झाल्यावर 100 डेसिबल चा आवाज ही त्याच्या श्रवणशक्ती पुढे फिका ठरेल. तुम्ही आनंद विखरत आहात दादा.. कुणास वाईट वाटायचे काहीच कारण नाही. भलेही खाजगीत ज्या चर्चा रंगतात की दादा कुणालाही चहा पाजत नाही, पत्रकारांना जाहिराती देत नाही.. त्यांना जरा तुमच्या दांडियाच्या मंचावर बोलवाच. आणि जसे बावनकुळे म्हणाले तशी त्यांची चहा पाण्याची व्यवस्था करा. मग कमाल बघा.. एक तरी पत्रकार तुमच्या बद्दल काही लिहिल तर..... दादा तुम आगें बढो हम तुम्हारे साथ है।

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...