Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *जि. प. शाळेतील दांडीयाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*जि. प. शाळेतील दांडीयाची परवानगी रद्द करा ; मुख्याध्यापक व शिक्षणाधिकाऱ्यांवर कार्यवाही करा* *आमदार सुभाष धोटेंची शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी*

*जि. प. शाळेतील दांडीयाची परवानगी रद्द करा ; मुख्याध्यापक व शिक्षणाधिकाऱ्यांवर कार्यवाही करा*    *आमदार सुभाष धोटेंची शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी*

*जि. प. शाळेतील दांडीयाची परवानगी रद्द करा ; मुख्याध्यापक व शिक्षणाधिकाऱ्यांवर कार्यवाही करा*

 

*आमदार सुभाष धोटेंची शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- जागरूक नागरीक राजुरा जि. चंद्रपूर यांचे प्राप्त निवेदनानुसार राजुरा येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कुल व ज्युनियर कॉलेज राजुरा येथे 100 वर्षाची परंपरा मोडीत काढत शासकीय परिसरात धमाल दांडीया कार्यक्रम घेतलेला आहे. मुख्याध्यापक श्री. उईके यांना शासकीय जागा कार्यक्रमासाठी देण्याचा कोणताही अधिकार नसतांना स्वतःची खाजगी मालकी समजुन शाळा व्यवस्थापन समिती किंवा राजुरा शहरातील कोणत्याही गणमान्य व्यक्तीशी चर्चा न करता मुख्याध्यपकाने परस्पर दांडीया कार्यक्रमासाठी शाळा परिसराची जागा देण्यात आली असल्याचे निवेदनात नमुद आहे.

      सदर शाळेच्या बाजुला 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असुन परिसरातील दुर्धर आजाराचे रुग्ण, लहान बालके, गरोदर माता इत्यादी 100 ते 150 रुग्ण 24 तास नियमीत भरती आहेत. डी.जे.च्या 100 (IB) डेसीबल च्या वरून सुरू असलेल्या कर्कश आवाजामुळे उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रूग्णाच्या जिवाशी खेळ सुरू आहे जेव्हा की, रहिवास वापर व रुग्णालय परिसरात रात्रीच्या वेळेस 40 ते 45 (IB) डेसीबल आवाजाची मर्यादा असतांना नियमांचे उलंघन करून शासकीय कार्यालयाचे परिसरात कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे नियमाचे उलंघन करून परवानगी देणारे संबधित मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांचेवर तातडीने कार्यवाही करून सेवेतून निलंबीत करण्याबाबतची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे शासकीय जागेच्या शाळा परिसरात दांडीया कार्यक्रमाला NOC देणारे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांचेवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी व कार्यवाही बाबतचा अहवाल माझे कार्यालयास अवगत करून देण्यात यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींना सुद्धा देऊन जि. प. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे सुरू असलेल्या दांडीया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...