*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोरपना :
आज दि.16/10/2023 ला परसोडा व कोठोडा बु. पेसा ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात झाले आहे. Rccpl सिमेंट कंपनी, परसोडा चुनखडी लिज क्षेत्र संदर्भात, परसोडा व कोठोडा बु पेसा ग्रामपंचायत व प्रकल्प ग्रस्त फसवणूक प्रकरणी , अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा,अनेक निवेदने व आँनलाईन तक्रारी मा. राष्ट्रपती व पंतप्रधान आफिस मधून कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पाठविण्यात आले होते. स्थानिक जन आक्रोश आंदोलन व दोन वेळा उपोषण ही करण्यात आले आहेत, पेसा ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव माध्यमातून परसोडा चुनखडी लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत दोन वेळा ठराव जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला पाठविण्यात आले होते, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाहीत, कंपनी चे अवजड वाहतूक मुळे परसोडा गाव रस्ता संपुर्ण रखडले आहे, परसोडा ग्रामपंचायत कडून कंपनी चे उत्खनन व काम दि.01/09/2023 ला नियमानुसार काम बंद पाडले होते. परंतु पेसा अनुसूचित क्षेत्रात, कंपनी ने दलाल मार्फत कवडीमोल भावाने खरेदी केलेल्या जमिनी वर जबरदस्ती उत्खनन व वाहतूक सुरू आहे.करिता पेसा ग्रामपंचायत ला दिलेल्या अधिकार क्षेत्र वाचविण्यासाठीव प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी, दोन्ही ग्रामपंचायत माध्यमातून श्री नेमीचंद विश्वनाथ काटकर ह्यांच बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे, ह्या वेळी सरपंच,परसोडा ग्रामपंचायत सौ. गिरीजा ताई रामभाऊ कोहचाडे, उपसरपंच सतिश गोनलावार,कोठोडा बु. ग्रामपंचायत सरपंच रमेश जी मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम जी पेचे, रामभाऊ कोहचाडे, अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता, सखाराम तलांडे,निकेश केतकर, गंगाधर जी मॅकलवार, सतिश काटकर , आशिर्वाद येमुर्लेवार, विनोद सिगुरलावार,साई जनगमवार, संजय सोडमवार, दिनेश चांदेकर इ.बरेचसे स्थानिक लोक हजर होते.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...