Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावतीत स्व. श्रीनिवास...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावतीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापनदिना प्रित्यर्थ भव्य रोग निदान शिबिर* *तीनशे रुग्णांची तपासणी : तेवीस रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे ) रुग्णालयात पाठविणार*

*भद्रावतीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापनदिना प्रित्यर्थ भव्य रोग निदान शिबिर*    *तीनशे रुग्णांची तपासणी : तेवीस रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे ) रुग्णालयात पाठविणार*

*भद्रावतीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापनदिना प्रित्यर्थ भव्य रोग निदान शिबिर*

 

*तीनशे रुग्णांची तपासणी : तेवीस रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे ) रुग्णालयात पाठविणार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 भद्रावती:-स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वर्धापनदिना -प्रित्यर्थ ट्रस्टच्या ‘ श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांनातर्गत ’    स्थानिक श्री मंगल कार्यालयात दि. १३ ऑक्टोंबर रोज शुक्रवारला‘भव्य  रोग निदा  शिबिर ’  आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय , सावंगी ( मेघे ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधितज्ज्ञ तथा चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपूते , उद्घाटक सेवा निवृत्त भुमीलेख अधिकारी चंपत आस्वले, ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे ,  अतिथी म्हणून  , सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय पिंपळशेंडे ,सेवानिवृत्त प्रा. बंडू जांभूळकर, पुरुषोत्तम मत्ते, डॉ. शशांक गोतरकर, डॉ. मयंक शर्मा, डॉ. वैभव चंद्रा आणि ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले प्रामुख्याने उपस्थित होते.

 या शिबिरात तीनशे रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आला. तेवीस रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे ) रुग्णालयात पाठविण्याची शिफारस करण्यात आली.

   याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक चंपत आस्वले , पुरुषोत्तम मत्ते, मदन ठेंगणे, विजय पिंपळशेंडे. चंपत आस्वले, माजी सैनिक विजय

तेलरांधे ,बंडू जांभूळकर आणि भैयाजी मिरगे यांनी  आपल्या मनोगतात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची भरभरून प्रशंसा केली.

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे, निलीमा शिंदे, रुपाली शिंदे,  ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे आणि वर्षा कुरेकर,वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ते मुर्लीधर उमाटे आणि ट्रस्टचे सचिव संजय तोगट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सुत्रसंचलन प्रा.डॉ. सुधीर मोते आणि आभार प्रदर्शन ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे यांनी केले.

 *[ ट्रस्टचे सामाजिक कार्य, सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी : अँड. पुरूषोत्तम सातपूते*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य सर्वांसाठी सदैव  प्रेरणादायी आहे. कोरोना संक्रमण कालावधीत  हजारो रुग्णांना जिवदान देण्याचे महापूण्याचे कार्य या ट्रस्टने केले आहे.जे का रंजल्या कांजल्यांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या या ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीची दखल अखील समाजाने घेतली आहे. यामुळेच या ट्रस्टच्या कार्याला जनतेकडून फार मोठा पाठींबा मिळत असल्याचे प्रतिपादन  अँड. पुरूषोत्तम सातपूते यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...