Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *जनतेनी आपल्या न्याय,...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*जनतेनी आपल्या न्याय, हक्क व कर्तव्याप्रती नेहमी तत्पर असावे : प्रा. शिल्पा बोडखे* *चंदनखेडा येथे ‘ होऊ द्या चर्चा ! ’ अभियानाअंतर्गत जनसंवाद*

*जनतेनी आपल्या न्याय, हक्क व कर्तव्याप्रती नेहमी तत्पर असावे : प्रा. शिल्पा बोडखे*    *चंदनखेडा येथे  ‘ होऊ द्या चर्चा ! ’ अभियानाअंतर्गत जनसंवाद*

*जनतेनी आपल्या न्याय, हक्क व कर्तव्याप्रती नेहमी तत्पर असावे : प्रा. शिल्पा बोडखे*

 

*चंदनखेडा येथे  ‘ होऊ द्या चर्चा ! ’ अभियानाअंतर्गत जनसंवाद*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

  भद्रावती :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बहाल केला  आहे. मतदान हे साधारण दान नाही. मतदानाचे  मुल्य आपण जाणले पाहीजे. लोकशाही राज्यप्रणालीत मतदानाच्या हक्काच्या बळावर प्रत्येक नागरिकांना देशाच्या कारभारात  अप्रत्यक्षपणे सहभाग घेता येतो. म्हणून मतदानाचा हक्क बजावतांना कोणता लोकप्रतिनिधी समाजाचा सर्वांगिण विकास अंतकरण : पूर्वक आणि निस्वार्थ वृत्तीने  करेल याची जाणीव ठेवून जनतेनी आपल्या न्याय, हक्क व कर्तव्याप्रती नेहमी तत्पर असावे . असे आवाहन

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पुर्व विदर्भ महिला संघटिका तथा प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे  यांनी केले.

  तालुक्यातील चंदनखेडा येथील कर्मवीर सभागृहात नुकत्याच आयोजित  ‘ होऊ द्या चर्चा ! ’ जनसवांद कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाचा भांडाफोड करतांना प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्रा. शिल्या बोडखे  उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.    

    याप्रसंगी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५  वरोरा -भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख  रविंद्र शिंदे मार्गदर्शन करतांना   म्हणाले की, वर्तमान परिस्थितीत  देशातील लोकशाही प्रणालीला धोका निर्माण झाला आहे. शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. शेत पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. यामुळे शेतकरी व युवकांत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. महागाईने उंचाक गाठला आहे. महिलांवरील  अन्याय व  अत्याचार वाढत  आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण ? आहे. याचा विचार आपण करावा. यापूढे सतत सावध राहूण आपण कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी उपस्थितांना केले..

 याप्रसंगी व्यासपिठावर पूर्व विदर्भ महिला संघटिका तथा प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख  रविंद्र शिंदे, युवा सेनेचे प्रा.निलेश बेलखेडे , महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरकर, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, तालुका उपप्रमुख तथा मुधोलीचे सरपंच बंडू पा.न्नावरे,युवती सेना जिल्हा युवती अधिकारी  प्रतिभा मांडवकर, विधानसभा संघटक मंगेश भोयर, कंत्राटी कर्मचारी कामगार सेना जिल्हा महासचिव अमोल मेश्राम आणि  युवा सेना प्रमुख राहूल मालेकर उपस्थित होते. इतर मान्यवर मंडळींनी सुध्दा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा भांडाफोड करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी चंदनखेडा परिसरातील बंधू -भगिनी फार मोठया संख्येत  उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...