Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अपघातग्रस्त वाहनचालक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अपघातग्रस्त वाहनचालक अनंता रामटेके यांना वाहनचालक संघटनेकडून ₹ ५०००/- रुपये महिना मदत. स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक*

*अपघातग्रस्त वाहनचालक अनंता रामटेके यांना वाहनचालक संघटनेकडून ₹ ५०००/- रुपये महिना मदत.  स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक*

*अपघातग्रस्त वाहनचालक अनंता रामटेके यांना वाहनचालक संघटनेकडून ₹ ५०००/- रुपये महिना मदत.  स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गढचांदुर:-वाहन चालकांचे हित जपण्याचा उदात्त हेतू ठेवून कार्यरत असलेली अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या संघटनेचे सभासद वाहनचालक अनंता रामटेके यांचे मोटारसायकल अपघातात दोन जागी मोडलेल्या उजव्या पायाचे गांभीर्य लक्षात घेऊन जखम दुरूस्त होऊन चालते फिरते होई पर्यंत वाहनचालक संघटनेच्या वतीने रूपये पाच हजार रुपये महिना सुरू करण्यात आला आहे.अनंता रामटेके हे अम्बुजा सिमेंट उपरवाही येथील डीएनआर ट्रान्सपोर्ट कम्पनीत ट्रकवर वाहनचालक या पदावर कार्यरत आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२३ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास रामटेके यांनी आपल्या कामाचा निपटारा करून ड्युटी संपवून आपला ट्रक अम्बुजा सिमेंट येथील पार्किंगला उभा केला आणि आपल्या घरी चंद्रपूर येथे जावयास निघाला. राजुरा- गडचांदूर महामार्गावर मालपाणी सेलिब्रेशन सभागृहाजवळील अभिनंदन बार एन्ड रेस्टॉरंट जवळ रामटेके यांच्या मोटारसायकलला हरदोना बुद्रुक येथील आमने यांच्या मोटारसायकलने मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रामटेके यांच्या उजव्या पायांवर दुचाकी पडल्याने पाय दोन जागी तुटला. आपल्या सहकारी वाहनचालक रामटेके यांचा अपघात झाला ही बाब वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष सुरज उपरे यांच्या सहकाऱ्यांना माहिती झाल्याबरोबर त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे भरती केले. परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच येथील डॉक्टरांनी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. चंद्रपूर येथील डॉ. बुक्कावार यांच्या दवाखान्यात त्यांना भरती करण्यात येऊन त्यांच्या उजव्या पायाची शस्त्रक्रिया करून दोन जागी पाय जोडण्यात व पायात रॉड टाकण्यात आला असून डॉक्टरांनी यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.अनंता रामटेके यांचा अपघात झाला तेव्हा पासून अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष सुरज उपरे आणि यांच्या वाहनचालक सहकाऱ्यांनी रामटेके यांना दवाखाना, पोलिस ठाण्या संदर्भात आणि अन्य घरातील सदस्य समजून सर्वोतोपरी मदत केली. तसेच दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ ला अध्यक्ष यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले सहकारी गडचांदूर अध्यक्ष सत्यपाल भिमा गौरकार, उमाकांत शामराव वाघमारे व रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांच्या समवेत चंद्रपूर येथील अनंता रामटेके यांच्या घरी जाऊन त्यांची आई आणि पत्नी सपना अनंता रामटेके यांच्या उपस्थितीत रोख रक्कम पांच हजार रुपये दिले आणि दुरूस्त होईपर्यंत दर महिना पांच हजार रुपये महिना देण्याची ग्वाही देण्यात आली.अनंता रामटेके आणि यांच्या कुटुंबीयांवर अपघातामुळे पडलेल्या दुःखाच्या पळता काळात अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची ही छोटीशी मदत नक्कीच फलदायी आशेची किरण देणारी आहे. सुरज उपरे आणि यांच्या सहकाऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...