Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे*

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे*

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-येल्लो मोझॅक व विविध किड, रोगप्रादुर्भावामुळे  चंद्रपूर जिल्ह्य़ातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसुलमंत्री आणि संबंधित विभागांना निवेदन पाठवून जिल्हातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या गंभीर अस्मानी संकटाची योग्य दखल घेऊन हेक्टरी १ लाख रुपये मदत करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी केलेली आहे. मात्र अनेक दिवस होऊनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही ठोस शासकीय मदत शासनाने जाहीर केलेली नाही. जिल्हात एकूण ३७ हजार हेक्टर च्या वर सोयाबीन पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना, गोडपिपरी, जिवती, पोंभुर्णा तसेच जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीकांवर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त होऊनही शासनाकडून केवळ शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली जात आहे आणि वेळ मारून नेली जात आहे. यामुळे शेतकर्‍यांची धाकधुक आनखी वाढली आहे.

शासकीय मदतीसाठी जिल्हातील शेतकरी आक्रोश करीत असताना राज्याच्या महसूलमंत्रींनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना जिल्हात बोलावून या रोग प्रदुर्भावाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असे सांगितले. तसेच जिल्ह्याधिकराऱ्यांनी सुद्धा काही भागात पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत ठोस घोषणा केलेली नसून शेतकर्‍यांची दिवाळी गोड होईल की नाही याबाबत शेतकरी चिंतेने ग्रस्त आहेत. आता तरी मायबाप सरकार शेतकर्‍यांचा हंबरडा ऐकून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडे केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...