Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / एम्टा कामगारांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

एम्टा कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन कामगारांना भीक नको त्यांना त्यांच्या हक्क द्या ; प्रशांत डाखरे

एम्टा कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन      कामगारांना भीक नको त्यांना त्यांच्या हक्क द्या ; प्रशांत डाखरे

एम्टा कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 

 

कामगारांना भीक नको त्यांना त्यांच्या हक्क द्या ; प्रशांत डाखरे

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

 

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती :- तालुका अंतर्गतगत येत असलेल्यांनी बरांज येथील कर्नाटका एम्टा खाणीत कंपनीच्या आधीनस्थ काम करणाऱ्या ठेकेदारी कंपनीत काम करीत असलेल्या मजुरांचे शोषण होत असून त्यांच्या अनेक समस्या आहेत.या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात यावे यासाठी माजी नगरसेवक तथा भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या अनेक मागण्यांचे निवेदन येथील तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.या समस्या पंधरा दिवसात निकालात न काढल्यास भाजप तर्फे कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सनी पॉईंट येथे घेण्यात आलेल्या एका पत्र परिषदेतून महामंत्री प्रशांत डाखरे यांनी दिला आहे. यावेळी कामगारांना भीक नको त्यांना त्यांचा हक्क द्या असे प्रशांत डाखरे यांनी ठणकावून सांगितले. कंपनीतील सर्व कामगारांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे कंपनीकडून नियमित ईपीएफ भरल्या जात नाही ते नियमित भरण्यात यावे, खाणीत काम करणाऱ्या कामगारांचा व त्यांच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा, खाणीत काम करणाऱ्या कामगारांना बोनस व वेतनासह नियमानुसार विविध प्रकारची रजा मंजूर करण्यात यावी, कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांचा 50 लक्ष रुपयांचा विमा काढावा व त्याची मासिक रक्कम कंपनीतर्फे भरल्या जावी, खाणीत काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपकरणे कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात यावी,कामगारांना दुपारच्या सुट्टीत खाण परिसरात आराम करण्यासाठी रेस्ट हाऊस उपलब्ध करून द्यावे, कामगारांसाठी खाण परिसरात कंपनीतर्फे अल्प दरात उपहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,खाण परिसरात कामगारांना पिण्याचे शुध्द व थंड पाणी ऊपलब्ध करुन द्यावे,राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कंपणीत 80 टक्के स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना रोजगार ऊपलब्ध करुन द्यावा, बरांज,किलोणी, तांडा, मानोरा,कोंढा या परिसरातील जमिनी कंपणीतर्फे घेण्यात आल्या मात्र जमिनीचे अवार्ड अद्याप पर्यंत जाहिर करण्यात आलेले नाहीत ते अवार्ड त्वरित जाहिर करावे अशा मागण्या निवेदनाव्दारे शासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत.पत्रपरिषदेला शहर महामंत्री प्रशांत डाखरे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नाना हजारे,रामाजी मत्ते, रवी डोंगे,राजु मत्ते आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...