आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
नागरिकांनी केला दीड तास चक्का जाम आंदोलन
घुग्घुस : वेकोलीच्या पैनगंगा,मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त गुंडगिरी व नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या एच. आर. जी कंपनीच्या MH 34 BG 9075 या भरधाव वाहनाने MH 12 KE 4414 या विरुद्ध येणाऱ्या कारला जबर धडक दिली.
या अपघातात कारला प्रचंड नुकसान झाले असून कार मधील चिमुकल्या मुलीला मार लागले आहे
दीड तास चक्काजाम
याकंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे तसेच अपघातग्रस्तांना मोबदला मिळावा,एच आर जी कंपनीचा मालक श्रीराम घटणा स्थली दाखल होऊन सर्व सहमतीने घटणेचा निष्कर्ष काढाव याकरिता नागरिकांनी दीड तास चक्काजाम करीत आपला संताप व्यक्त केला.
*पोलिसांचा तगडा बंदोबस्त*
घुग्घुस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आसिफराजा हे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह उपस्थित होत परिस्थितीला आटोक्यात आणले व एच.आर.जी कंपनीचे हायवा वाहन पोलीस स्टेशनला लावले
*एच. आर. जी. जिथे वाद तिथे*
राजस्थान येथील हरिराम गोधरा यांची ही कंपनी प्रचंड वादग्रस्त असून विना ताडपत्री क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणे
कोळसा पडून दुचाकी स्वरांचे अपघात झाल्यास त्यांनाच गुंडाकरवी दमदाटी देणे स्थानिक नागरिकांशी हुज्जत वाद घालणे, वाहन अतिशय वेगाने चालवणे,वातावरण प्रदुषित करने,शेत पिकाचे नुकसान करने,वारंवार अपघात करणे असे नेहमीचे झाले आहेत
वेकोली अधिकाऱ्यांचा छुपा समर्थन
एच .आर.जी.कंपनी हे सतत ओव्हरलोड कोळसा पैनगंगा मुंगोली खाणीतुन घुग्घुस येथील नवीन व जुन्या सायडिंगवर आणीत असतो या ओव्हरलोड व नियमबाह्य वाहतुकीस वेकोलीचे नोझल अधिकारी,काटा बाबू,मुंगोली सब एरिया,सायडींग ईचार्ज,संगनमत असून चिरी - मिरी मुळेच वेकोली अधिकाऱ्यांचे डोळे व तोंड बंद आहेत
*RTO चे ही दुर्लक्ष*
एच आर जी कंपनीच्या अवैध कृत्याकडे आर.टी.ओ देखील डोळे बंद करून बसल्याचे निरदर्शनास येत आहे
कंपनीच्या ओव्हरलोड वाहनावर एक दिवसांपूर्वी पोलिसांनी दंड थोटावला मात्र आर. टी. ओ. गाढ झोपेत असल्याने किंवा सोंग घेतल्यानेच कारवाई केली जात नाही
आजच्या अपघाता नंतर पोलीसांनी एच आर जी कंपनीच्या बारा वाहनांना दंड ठोठावला आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...