Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *केंद्रातील भाजप सरकार...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*केंद्रातील भाजप सरकार फसवेगिरी करणारे : मनोज जामसुतकर* *"होऊ द्या चर्चा" अभियानाअंतर्गत भद्रावती येथे भव्य भांडाफोड कार्यक्रम* *जनतेच्या उत्कृष्ट प्रतिसादात भरगच्च जनसंवाद संपन्न*

*केंद्रातील भाजप सरकार फसवेगिरी करणारे : मनोज जामसुतकर*    *

*केंद्रातील भाजप सरकार फसवेगिरी करणारे : मनोज जामसुतकर*

 

*"होऊ द्या चर्चा" अभियानाअंतर्गत भद्रावती येथे भव्य भांडाफोड कार्यक्रम*

 

जनतेच्या उत्कृष्ट प्रतिसादात भरगच्च जनसंवाद संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-केंद्र सरकार हे फसवेगिरी करणारे आहे, आतापर्यंत मागील एका दशकात केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून देशातील जनतेची फसवणूक केलेली आहे. या फसव्या केंद्र सरकारला त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे जनतेने लोकशाही प्रधान देशात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता केंद्र सरकारला येत्या काळात त्यांची जागा दाखवावी व या देशातून अशा भ्रष्ट व फसव्या सरकारला तथा पक्षाला हद्दपार करावे, असे आवाहन मनोज जामसुतकर यांनी केले.  स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे "होऊ द्या चर्चा" अभियानांतर्गत भांडाफोड कार्यक्रम आज (दि.४) ला भरगच्च संपन्न झाला. “होऊ द्या चर्चा” जनसवांद अंतर्गत केंद्र व राज्य सरकारचा भांडाफोड करण्यात आला. स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे पक्षाचे उपनेते, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र निरीक्षक, कामगार नेते माजी नगरसेवक मनोज जी. जामसुतकर, मुंबईचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील मुंबई युवा सेनेचे समन्वयक अमित जाधव, उदय वागडेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने विधानसभा क्षेत्रातील जनतेसोबत जनसवांद साधण्यात आला.पुढे बोलताना जामसुतकर म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही नाही तर बेबंदशाही आहे. भाजपचा आजपर्यंतचा प्रवास हा अहंकारीपनाकडे जाणार आहे. भाजपचा प्रवास फसवणुकीचा आहे. भाजपने इडीची व्यक्ति वाढवून व तिचा गैरफायदा घेऊन विश्वासहार्यता गमावली आहे. आणि सध्या राज्यात असलेले मिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, हे एक आदर्श उदाहरण आहे. जर त्यांनी राजीनामा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याप्रमाणे आजही ते मुख्यमंत्री असते.यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे आपल्या भाषणातून म्हणाले की, शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही. जसे वीस-पंचवीस वर्षे भाजप सोबत होतो पण शिवसेनेची भाजप कधी झाली नाही, असे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. आणि प्रत्येक शिवसैनिकांनी तथा जनतेने हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे अंगीकृत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा वापर करून समाजामध्ये जाऊन शेवटच्या टोकापर्यंत जनतेची निस्वार्थपणे सेवा करावी आणि प्रत्येक माय माऊली पितृदुल्य व्यक्ती, युवा या प्रत्येक व्यक्तीच्या मागे शिवसेना उभी आहे. देश गुलामीच्या दिशेने जात आहे मात्र शिवसेना हे होवू देणार नाही.यावेळी प्रमुख उपस्थिती वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, नर्मदा बोरेकर (चंदपूर जिल्हा प्रमुख महिला आघाडी), युवा सेना सचिव, पूर्व विदर्भ तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, भास्कर ताजने (उप-जिल्हा प्रमुख), कु.प्रतिभा मांडवकर युवतीसेना (जिल्हा युवती अधिकारी), वैभव डहाणे (विधानसभा समन्वयक), मंगेश भोयर (विधानसभा संघटक), नरेद्र पढाल (भद्रावती तालुका प्रमुख), दत्ता बोरेकर (वरोरा तालुका प्रमुख), सौ मायाताई नारळे (उपजिल्हाप्रमुख महीला आघाडी), घनश्याम आस्वले (भद्रावती शहरप्रमुख), राहुल मालेकर (युवासेना प्रमुख), सौ अश्लेषा जिवतोडे भोयर (भद्रावती तालुकाप्रमुख महीला आघाडी तथा युवतीसेना जिल्हा समन्व्यक), सौ. माया टेकाम (भद्रावती शहर प्रमुख महीला आघाडी), शिला आगलावे (उपतालुका संघटिका), शिव गुडमल (युवतीसेना उपजिल्हाधिकारी), नेहा बनसोड (भद्रावती तालुका युवती अधिकारी), सौ भावनाताई खोब्रागडे (समन्वयक भद्रावती शहर) व समस्त वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी  व शिवसैनिकांची उपस्थिती होती.यावेळी शेकडो युवकांनी शिवसेनेच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून जामसुतकर यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...