Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / भद्रावती पोलिसांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

भद्रावती पोलिसांची दडपशाही कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू मृत कामगाराच्या न्यायासाठी लढणाऱ्या शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुखाला बळजबरीने अटक

भद्रावती पोलिसांची दडपशाही    कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू    मृत कामगाराच्या न्यायासाठी लढणाऱ्या शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुखाला बळजबरीने अटक

भद्रावती पोलिसांची दडपशाही

 

कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

 

मृत कामगाराच्या न्यायासाठी लढणाऱ्या शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुखाला बळजबरीने अटक

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२.

 

 

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : तालुक्यातील कर्नाटक एम्टा कंपनीतील केपीसीएल याठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.कंपनी प्रशासनातर्फे सदर मृत कामगाराला आर्थिक मदत देण्याची मागणी केल्या जात होती मात्र मुजोर कंपनी प्रशासनाने मागणी मान्य न केल्याने मृत कामगारांच्या कुटुंबीयांनी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याशी संपर्क केला असता जिल्हाप्रमुख यांनी आक्रमक भूमिका घेत कंपनी प्रशासनाला जाब विचारला व मृत कामगाराच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे भद्रावती पोलीस प्रशासनाने शिवसेना जिल्हाप्रमुख यांना बळजबरीने अटक केल्याने भद्रावती पोलिसांची दडपशाही समोर आली आहे.भद्रावती येथील कर्नाटक एम्टा कंपनीतील केपीसीएल येथे काम करणाऱ्या जितेंद्र रामअवतार कर्णधार वय ३६ वर्ष राहणार महाकाली कॉलारी, चंद्रपूर या कामगाराचा दिनांक २ ऑक्टोंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कंपनी प्रशासनातर्फे सदर कामगाराचा इपीएफ तसेच एएसआयसी भरण्यात आला नाही. तसेच कंपनी प्रशासनातर्फे मृत कामगाराला कुठलीही आर्थिक मदत देण्यात टाळाटाळ करत असल्याने मृत कुटुंबियांच्या परिवारानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याशी संपर्क केला असता त्वरित ग्रामीण रुग्णालय भद्रावती गाठत. सदर मृत कामगाराचा इपीएफ तसेच इएसआयसी का भरला नाही? याबाबत जाब विचारला तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती. मात्र कंपनी प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन पळता पाय काढला. त्यामुळे मृत कामगारांच्या कुटुंबीयांचा  रोष वाढण्याने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी मृत कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी  कंपनीकडे धाव घेतली मात्र पोलीस प्रशासनाने दडपशाही दाखवत त्यांना अटक केली. व कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर मृत कामगारांच्या कुटुंबीयांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन मृत कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी कितपत तत्पर राहील की झाकली मूठ साव्वा लाखाची म्हणून कंपनी प्रशासनाला पाठीशी  घालेल हे बघणे आता औचित्याच्या ठरणार आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...