Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *स्व.मीनाताई जवादे यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*स्व.मीनाताई जवादे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य आयोजित आरोग्य शिबीर व कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला मौजा.हिरापूर येथे प्रचंड प्रतिसाद* *राहुलभाऊ जवादे व विजयकिरण फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम,वडेट्टीवार कुटुंबियांची उपस्थिति*

*स्व.मीनाताई जवादे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य आयोजित आरोग्य शिबीर व कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला मौजा.हिरापूर येथे प्रचंड प्रतिसाद*    *राहुलभाऊ जवादे व विजयकिरण फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम,वडेट्टीवार कुटुंबियांची उपस्थिति*

*स्व.मीनाताई जवादे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य आयोजित आरोग्य शिबीर व कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला मौजा.हिरापूर येथे प्रचंड प्रतिसाद*

 

राहुलभाऊ जवादे व विजयकिरण फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम,वडेट्टीवार कुटुंबियांची उपस्थिति

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-३ ऑक्टो.२०२३

आज सावली तालुकातील मौजा.हिरापूर येथे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून व विजय किरण फाउंडेशन तर्फे कॅन्सर तपासणी व माजी उपसभापती पं.स.मूल स्व.मीनाताई जवादे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्याने मा.राहुलभाऊ जवादे यांच्या पुढाकारातून आरोग्य तसेच डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हिरापूर,बोथली,केशरवाही,मुंडाळा,चकपिरंजी,पेंढरी मक्ता येथील लोकांना सेवाभावी मोफत डोळ्यांची तपासणी,मोफत चष्म्यांचे वाटप,मोफत रक्तदाब व मधुमेह तसेच कॅन्सर तपासणी गाडी द्वारे तोंडाचे, गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान या शिबिरात सोयी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल.उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.आज हिरापूर येथे तब्बल १०००-१५०० नागरिकांनी कॅन्सरची तपासणी व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टरांनी पॉसिटीव्ह असलेल्या रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे.या शिबिरा प्रसंगी विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सौभाग्यवती किरणताई वडेट्टीवार,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार,आद.रोशनीताई वडेट्टीवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,हिरापूरचे उपसरपंच मा.शरद कन्नाके,मा.शिवानी वडेट्टीवार, सेवा सोसायटी सदस्य मा.मुखरू पाटील गोहने, मा.राहुलभाऊ जवादे, मा.गणेश जवादे, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल नागपूर, धनन्वंतरी हॉस्पिटल गडचिरोली येथील डॉक्टर व कर्मचारी तसेच काँग्रेस कमिटीचे कार्यकर्तागणं व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...