Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *निशा कांबळेनी घेतला...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*निशा कांबळेनी घेतला अखेरचा श्वास : सोईट परीसरात सर्वत्र हळहळ* *निशाच्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिला होता मदतीचा हात*

*निशा कांबळेनी  घेतला अखेरचा श्वास : सोईट परीसरात सर्वत्र हळहळ*     *निशाच्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिला होता मदतीचा हात*

*निशा कांबळेनी  घेतला अखेरचा श्वास : सोईट परीसरात सर्वत्र हळहळ*

 

 निशाच्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिला होता मदतीचा हात

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 भद्रावती:-वरोरा तालुक्यातील सोईट ( नविन ) येथील निशा रमेश  कांबळे ( २१ वर्षे )  ही युवती मागील काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होती.  सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करीत निशा कांबळे यांच्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून गेले .रविंद्र शिंदे यांनी स्वखर्चातून   ऑक्सीजन मशीन उपलब्ध करुन  निशाला जगण्याची नवी उमेद देण्याचा प्रयत्न केला. परंतु काळ मात्र फारच  निष्ठुर झाला. त्याने  निशावर शेवटी  झडप घातली. काल दि. २९ सप्टेंबर रोजी चार वाजता निशाने अखेरचा श्वास घेतला. निशाच्या जाण्याचे वृत्त सोईट ( नवीन ) परीसरात पसताच सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

    सोईट ( नविन ) येथील कांबळे कुटूंबांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. यामुळे निशाच्या उपचारात असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या .तिच्या आजारपणात ऑक्सीजन मशीनची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  निशाचे पालक तिच्या आजाराने फारच दुःखी झाले होते. रविंद्र शिंदे यांच्याशी  त्यांनी संपर्क   साधून लेकीच्या आजाराची करून कहानी  कथन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र शिंदे यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ  निशाच्या आजारपणात ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली होती . तसेच अधीक मदतीचे आश्वासन सुध्दा  दिले होते. *निशाच्या जाण्यामुळे आम्ही  अत्यंत  दुःखी झालो असून  कांबळे परीवारांच्या दुःखात सहभागी आहोत. कांबळे कुटुंबियांची सांत्वना करण्यासाठी लवकरच भेट देणार आहो. असे प्रतिपादन रविंद्र शिंदे यांनी केले आहे.* *शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या वतीने निशाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.*

*जनतेनी आजारपण गांभिर्याने घ्यावे : गरजूंनी संपर्क साधावा*

धकाधकीच्या जिवनात आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.जनतेनी कुठलाही आजार  गांभिर्याने घ्यावा. आजारपणात संबंधीत रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांनी  जगण्याची उमेद व सकारात्मक विचारसरणी कायम ठेवावी.आजारातून बरे होण्यासाठी योग्य तो औषधोपचार घ्यावा. या संदर्भात काही अडचण असल्यास गरजूंनी  मदतीकरीता नि:संकोचपणे चोवीस तास  संपर्क साधावा. असे आवाहन ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...