Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / ऑटो चालक छगन बुरडकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

ऑटो चालक छगन बुरडकर नावाच्या देवदूताचे ऑटो असोसिएशन तर्फे भेटवस्तू व शाल श्रीफळ देवुन सत्कार.

ऑटो चालक छगन बुरडकर नावाच्या  देवदूताचे ऑटो असोसिएशन तर्फे भेटवस्तू व शाल श्रीफळ देवुन सत्कार.

ऑटो चालक छगन बुरडकर नावाच्या  देवदूताचे ऑटो असोसिएशन तर्फे भेटवस्तू व शाल श्रीफळ देवुन सत्कार.

 

 

रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : स्थानिक बस स्थानकासमोरील महामार्गाला लागून असलेल्या नालीतून वाहत गेलेल्या आठ वर्षीय बालिकेला छगन बुरडकर या ऑटो चालकाने चक्क तिचा जीव वाचविला. अशा या देवदूताचे भद्रावती ऑटो असोसिशनने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन एका समारोहत सत्कार करण्यात आला दिनांक २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भद्रावतीत अचानक मुसळधार पाऊस कोसळला तेव्हा तालुक्यातील पिरली येथील सानवी मंगेश आसुटकर ही ८ वर्षीय बालिका भद्रावती बस स्थानकासमोरील राज्य महामार्गाला लागून असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या नालीतून वाहत गेली. ती जवळपास ४०० फूट अंतरापर्यंत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तिने नालीच्या चेंबर वरील फरशीला धरून वाचवा वाचवा अशी विनवणी केली. अशातच ऑटो चालक छगन बुरडकर हा त्या ठिकाणी देवदूतच अवतरला. तिचे हाताची बोटे धरून त्याने शेजारील नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. जमलेल्या लोकांनी नालीवरील सिमेंट काँक्रीटचे चेंबर उचलून त्या बालिकेला नाली बाहेर काढले. यातून ती बालिका सुदैवाने बाल बाल बचावली बालिकेच्या आई-वडिलांनी ऑटो चालकाचे आभार मानले. त्याच्या या साहसाबद्दल ऑटो भद्रावती ऑटो असोसिएशन च्या वतीने एका समारोहात असोसिएशनचे अध्यक्ष बाळूभाऊ उपलंचीवार यांचे हस्ते एका समारोहात त्याचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. ऑटो चालक छगन बुरडकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...