Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आमदार सुभाष धोटेंकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आमदार सुभाष धोटेंकडून ढवळे कुटुंबाचे सांत्वन*

*आमदार सुभाष धोटेंकडून ढवळे कुटुंबाचे सांत्वन*

*आमदार सुभाष धोटेंकडून ढवळे कुटुंबाचे सांत्वन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना  :-तालुक्यातील गडचांदूर- सांगोडा राज्यमार्गावर ट्रकच्या धडकेत दिनांक १९ ला मंगळवारी आवाळपूर येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक रामदास ढवळे यांचे निधन झाले. तर मधुकर जोगी (६२) रा. आवाळपूर हे जखमी झाले. रामदास ढवळे व मधुकर जोगी हे अंतरगाव येथील रामदास ढवळे यांच्या जावयाकडे गणपती व नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेवण करावयास निघाले होते. आवाळपूर येथून थोड्याच अंतरावर हिरापूर गावाजवळ मारोती मून यांच्या शेताजवळ एका भरधाव ओव्हरलोड ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.ढवळे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर फार मोठा आघात झाला असून रस्त्याची दुरावस्था याला कारणीभूत आहे. नांदाफाटा- आवाळपूर- हिरापुर हा रस्ता मंजूर असून शिंदे फडणवीस सरकारने या रस्त्यावर स्थगिती आणली आहे. या विरोधात आपण विधानसभेत वारंवार आवाज उठवला. मात्र सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा आवाज ऐकायला येत नाही. आमदार जरी विरोधी पक्षाचा असला तरी जनतेच्या मागणीकडे राज्य सरकार म्हणून शासनाने लक्ष दिले पाहिजे. मात्र या निगरगट्टा सरकारला केवळ राजकारण करायचे असून स्थगिती सरकारच्या अशा वागण्यामुळे नागरिकांचे जीव जात असेल तर यापुढे आम्ही शांत बसणार नाही. असे आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी म्हटले. ढवळे परिवाराला संपूर्ण मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले असून यावेळी ढवळे कुटुंबीयांसह राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, महिला काँग्रेस अध्यक्ष आशा खासरे, आवाळपूर येथील माजी सरपंच सिद्धार्थ वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य कल्पतरू कन्नाके, सुरज कुळमेथे, स्वप्निल मुंगूल, ज्योती नाहर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...