Home / चंद्रपूर - जिल्हा / *जिल्ह्यातील 211 मतदान...

चंद्रपूर - जिल्हा

*जिल्ह्यातील 211 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त*

*जिल्ह्यातील 211 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त*

◆ *मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सूचना करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबरपर्यंत*

 

चंद्रपूर, दि. 25 : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (अहर्ता दिनांक 1 जानेवारी 2024 वर आधारित) अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या एकूण 2032 यादी भागांमध्ये राबविण्यात येत आहे.

 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत गृहभेटीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना देखील करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकत्रितरित्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे 137 प्रस्ताव, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे 54 प्रस्ताव, विलीन (मर्ज) करण्यात आलेले मतदान केंद्र 9 प्रस्ताव तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रावरील 1500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणारे 11 मतदान केंद्र असे एकूण 211 मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहे.

सदर प्रस्तावित बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. सदर प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडून मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. बदल करण्यात आलेल्या व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीररित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सूचना द्यावयाची असल्यास 28 सप्टेंबर 2023 पर्यंत सदर सूचना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयास देऊ शकतील.

छायाचित्र मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रितरित्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास एकत्रितरित्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील व त्या आधारे मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना देखील अस्तित्वात येईल. याबाबतची जाहीर नोटीस 21 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

0000000

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...