Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *आक्रमकपणा, अभ्यासू...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती असलेला कणखर विरोधी पक्षनेता :- मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार*

*आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती असलेला कणखर विरोधी पक्षनेता :- मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार*

*आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती असलेला कणखर विरोधी पक्षनेता :- मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-देशात ज्या प्रमाणे केंद्रात असो की राज्यात सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाला अनन्य साधारण असे महत्व असते त्याच प्रमाणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका खऱ्या अर्थाने पहारेकरी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका पार पाडत असतो. हा पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग व सुदृढ बनते.राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले, त्यावेळी काँग्रेसने काही महिन्यांसाठी ही जबाबदारी वडेट्टीवार यांच्या खांद्यावर सोपवली होती. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काही महिने शिल्लक असताना वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. सहा महिन्यात त्यांनी भाजपवर कडक प्रहार करुन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचं सोनं केलं. आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे.

विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून येतात. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत वडेट्टीवार यांचा मोठा सहभाग होता. शिवसेनेत असताना ते विविध विषयांवरून रोकठोक आंदोलने करायचे. तेव्हापासून विदर्भातील आक्रमक नेत्याची त्यांची प्रतिमा आहे.वडेट्टीवारांनी १९८६ साली गडचिरोलीतून राजकारणाचा श्रीगणेशा केला. २००५ साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९८ - २००४ दरम्यान ते विधानपरिषद सदस्य होते. त्यानंतर चिमूर आणि आता ब्रम्हपूरी मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य आहेत. याआधी जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री तसेच मविआ सरकारमध्ये बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री,व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम यशस्वीरित्या पार पाडले आहे.विजय वडेट्टीवार यांनी सक्रिय होत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा,अर्थसंकल्प व मागण्यांवरील चर्चा,प्रश्न,तहकुबीचा ठराव मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव इतर ठराव,सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणे समाजात निर्माण होणाऱ्या अराजकतेविरुद्ध भूमिका घेत दंगली,खून सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या विषयीची चौकशी करण्याचा आग्रह धरत आहेत,समाजतल्या अनेक समूहांच्या प्रश्नाला वाचा फोडने,उदा.-शेतकरी,कष्टकरी आदींच्या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवत आहेत,नुकतीच ओबीसी आरक्षण प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे व आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांना थेट प्रक्षेपण लोकांना दाखवविण्यासाठी विनंती केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राची नजर या निर्णयाकडे लागली आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...