Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कृषी उत्पण बाजार समीतीचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कृषी उत्पण बाजार समीतीचा अजब कारभार* *कॉंग्रेसच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी ९२ हजाराचा खर्च* *सभापती सचिव यांचे कडून वसुल करा -सुनिल बावणे*

*कृषी उत्पण बाजार समीतीचा अजब कारभार*    *कॉंग्रेसच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी ९२ हजाराचा खर्च*    *सभापती सचिव यांचे कडून वसुल करा -सुनिल बावणे*

*कृषी उत्पण बाजार समीतीचा अजब कारभार*

 

*कॉंग्रेसच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी ९२ हजाराचा खर्च*

 

*सभापती सचिव यांचे कडून वसुल करा -सुनिल बावणे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                            कोरपना:-कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा ही नुकत्याच नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या सत्तेत असलेली या बाजार समितीचा अनेक भोंगळ कारभार उघड होत असून या बाजार समितीच्या नियमबाह्य कारभाराने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात उत्पन्न होणारे उत्पादन बेकायदेशीर सचिव व सभापती यांच्या मर्जीने शेत जनतेच्या हक्काच्या पैशाला सुद्धा लावल्या जात आहे नुकत्याच एका काँग्रेस नेत्याच्यावाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्थसंकल्पात तरतूद नसताना व बाजार समितीच्या संचालकांना विश्वासात न घेता सचिव व सभापती आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्याच्या जन्मदिनानिमित्त वर्तमानपत्राला पन्नास हजाराची जाहिरात व बॅनर पोस्टर करिता 44 हजार एकशे रुपये खर्च करून जनतेच्या पैशाला चुना लावण्याचे काम केलं आहे सहकार विभागाचे याबाबत स्पष्ट निर्देश असताना अशा कामावर बाजार समितीचा निधी खर्च करता येणार नाही असे परिपत्रक असताना संचालक मंडळाचे परवानगी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये उघडपट्टी करणाऱ्या बेजबाबदार सचिव व सभापती यांनी बाजार समितीच्या 23 9 2023 च्या सभेमध्ये ठराव क्रमांक दोन नुसार खर्चाला मंजुरीचा प्रस्ताव दिला मात्र यावर बाजार समितीचे संचालक सुनील बावणे विकासदिवे दत्ता कांबळे राजीव ढवळे या संचालकांनी आक्षेप घेऊन खर्चाला नामंजूर करीत उपरोक्त खर्च नियमबाह्य व बेकायदेशीर उधळपट्टी झाल्याने सचिव व सभापतीकडून वसूल करण्यात यावी अशी तक्रार सुनील बावणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली असून या बाजार समितीमध्ये कापूस धान्य खरेदी शेस वसुलीमध्ये सुद्धा मोठा गोंधळ असून पक्षपातीपणा करून आकारणी केल्या जात आहे खुलेआम काही जिनिंग मध्ये सोयाबीन चना खरेदी झाली असताना त्याची नोंद देखील बाजार समितीकडे नाही बाजार समितीमध्ये मापारी ठेवण्यात आले मात्र खरेदी विक्री नियमानाचा पालन या बाजार समितीकडून केल्या जात नाही यामुळे या बाजार समितीच्या गेल्या पाच वर्षात अंकेशन अहवालामध्ये गंभीर आक्षेप पासून सचिवांनी याबाबतची पूर्तता केलेली नाही तसेच अनेक खर्च नियमबाह्य झाले असल्यामुळे विशेष पथक नेमून बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुनील बावणे यांनी केली आहे

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...