आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भद्रावती:-मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये या प्रमुख मागणीसह इतर प्रचलित तथा प्रलंबित मागण्यांकरीता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात तथा ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या (दि.२३) ला होणाऱ्या रस्ता जाम आंदोलनात सर्व ओबीसी बांधवांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे
आज (दि.२२) ला सदर उपोषणस्थळी श्री. रवींद्र टोंगे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विद्यार्थी ओबीसी महासंघ , चंद्रपूर यांचे शुगर व बीपी लो झाल्याने त्यांना पुढील उपचारकरीता दि. २२/०९/२०२३ रोजी ११.३० वाजता सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे हलविण्यात आलेले असून सदर उपोषण स्थळी श्री. रविंद्र टोंगे यांचे ऐवजी आजपासून (दि.२२) श्री. विजय पांडुरंग बलकी, वय ६३ वर्षे, माजी सभापती पंचायत समिती, चंद्रपूर तथा ग्रामपंचायत सदस्य वेरूर रा. मुक्काम वेरुर पोस्ट ताडाली तालुका, जिल्हा चंद्रपूर हे सदर अन्नत्याग उपोषणाकरिता बसलेले आहेत.
त्यानंतर दुपारी मातोश्री शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत असे ठरले की उद्या दिनांक २३ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता जनता कॉलेज चौक, चंद्रपूर येथे रस्ता जाम आंदोलन करायचे सर्वानुमते ठरले. तरी या रस्ता जाम आंदोलनात सर्व ओबीसी समाजाने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सदर उपोषण स्थळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर सर्व ओबीसी जातीय संघटनेचे पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. सचिन राजूरकर, श्री. पुरुषोत्तम सातपुते अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज ,चंद्रपूर, श्री. प्रदीप उर्फ पप्पू देशमुख, अध्यक्ष जनविकास सेना संघटना, चंद्रपूर, श्री. राजेश बेले, प्रा. श्याम लेडे, सौ. मनीषा बोबडे, सौ. गोमती पाचभाई, श्री. दिनेश चोखारे, सदस्य, बाजार समिती, चंद्रपूर आदी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...