वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
शहर वाहतूक पोलिसांची चालकांकडून दररोज हजारो रुपयांची वसुली-कॉम्रेड राजू गैनवार यांची तक्रार
✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२
(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : "ड्रंक अँड ड्राईव्ह" या प्रकरणात शहर वाहतूक पोलीस दुचाकीस्वारास कारवाईची भीती दाखवून दररोज हजारो रुपयांची अवैध कमाई करीत आहे. यासंदर्भात भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
दारू पिऊन दुचाकी वाहन चालविण्यास कायद्याने बंदी आहे. तसे केल्यास चालकास १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि दंड न भरल्यास कैद आहे.याचाच धाक दाखवून शहर वाहतूक पोलीस कारवाईच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची कमाई करीत आहे. ही कारवाई त्यांनी गर्दीच्या रस्त्यावर, महामार्गावर करावयास पाहिजे. तसे न करता ते गल्ली-बोळात जाऊन करीत आहे. दारू पिऊन दुचाकी, चार चाकी वाहन चालवून अपघात होऊ नये हा या कायद्यामागील उद्देश आहे. परंतु याच कायद्याचा आधार घेऊन चालकास धमकावून वसुली सुरू आहे. १० हजार रुपये असा जबर दंड असल्याने तडजोडीत चालक २ ते ५ हजार रुपये पर्यंत यातून सुटका करून घेतो. कायद्याच्या मूळ गाभ्यालाच येथील शहर वाहतूक पोलीस छेद देत आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे कॉम्रेड गैनवार यांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...